ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानला पडलं महागात; ‘या’ भागात दीडशेहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा.

बहावलपूर आणि मुरिदके येथे दहशतवादी संघटनांच्या बड्या म्होरक्यांना लक्ष्य करण्यात आल्यामुळे मृतांची संख्या वाढली आहे. यामुळे या संघटना खिळखिळ्या होण्यास मदत होणार आहे.भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये १५० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बहावलपूर आणि मुरिदके येथे दहशतवादी संघटनांच्या बड्या म्होरक्यांना लक्ष्य करण्यात आल्यामुळे मृतांची संख्या वाढली आहे. यामुळे या संघटना खिळखिळ्या होण्यास मदत होणार आहे. बहावलपूर येथील जैश ए महंमद वरील मुख्यालयाचा संबंध पहलगाम हल्ला आणि २०१९ च्या पुलवामा हल्ल्याशी असल्याचे सांगण्यात येते.कोटली येथे दहशतवादी प्रशिक्षण केंद्र होते.

तिथे ‘आयईडी’ची निर्मिती करण्यात येत होती, शिवाय तरुणांचे ‘ब्रेनवॉश’ करण्यात येत होते. या ठिकाणी सर्वाधिक १०० जण मारले गेले.लीपा भागातील लक्ष्य करण्यात आलेले केंद्र दहशतवाद्यांच्या जम्मू आणि काश्मीरमधील घुसखोरीसाठी महत्त्वाचे होते. ते नष्ट केल्यामुळे उन्हाळ्यातील संभाव्य घुसखोरी कमी होणार आहे. सूत्रांच्या मते, एकाच वेळी मोठ्या संख्येने दहशतवाद्यांना संपवणे म्हणजे पाकिस्तानमधील कथित सुरक्षित आश्रयस्थळांचा फोलपणा उघड करण्यासारखे आहे.

भारताची हवाई सुरक्षा प्रणाली आणि प्रत्यक्ष माहितीवर आधारित कारवाई याची ही मोठी यशस्वी झलक आहे.परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, भारताने संयम दाखवून ही कारवाई केवळ दहशतवादी केंद्रांपुरतीच मर्यादित ठेवली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितले की, किमान १०० दहशतवादी ठार झाले आहेत. मात्र कारवाई सुरू असल्यामुळे अचूक आकडे सांगणे कठीण आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.