क्विक अ‍ॅक्शन फोर्स; भारत-पाकिस्तान तणावानंतर पुण्यातील दगडूशेठ मंदिरात कडक बंदोबस्त.

भारत-पाकिस्तान तणाव वाढल्याने देशातील प्रमुख ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यातच पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सुरक्षेतही वाढ करण्यातभारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे काही शहरांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. पाकिस्तानच्या रेडारवर भारतातील धार्मिक स्थळ असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाल्यानंतर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात काल रात्रीपासून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या बंदोबस्तात अतिरिक्त पोलीस, SRPF, दंगल नियंत्रण पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक सहभागी होते. केवळ दगडूशेठ मंदिराच नव्हे तर पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा परिसरातही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

काल (8 मे) रात्रीपासून पुण्यात बंदोबस्त तगडा करण्यात आला आहे.धार्मिक स्थळांवर हल्ला होऊ नये म्हणून केंद्र आणि राज्य सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पुण्यातील दगडूशेठ मंदिरात वाहनांची तपासणी व परिसरात गस्त वाढवण्यात आली होती. आता सकाळी काहीसा बंदोबस्त शिथिल करण्यात आला असला, तरी काही शहरांमध्ये अद्याप हाय अलर्ट कायम आहे.भाविकांना दर्शनासाठी मंदिरात जास्त वेळ थांबू दिलं जात नाहीये. दर्शन करुन लोकांना लवकरात लवकर बाहेर काढलं जात आहे. लोकांना सूचना दिल्या जात आहेत की मंदिरात अधिक काळ थांबू नये.

मंदिराच्या बाहेर क्विक अॅक्शन फोर्स तैनात करण्यात आले आहे. हाती बंदुका घेऊन पुणे पोलिसांचे कमांडो सज्ज आहे.जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. या कारवाईत सुमारे 90 दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे.या घटनेनंतर पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू केला, ज्यामध्ये 16 भारतीय नागरिक मृत्युमुखी पडले आणि 59 जण जखमी झाले. या पार्श्वभूमीवर जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी आणि पूंछमधील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.