दोघांच्या भांडणात संसाराची माती, दोन पोरं झाली पोरकी; कोल्हापुरात पत्नीने पतीला संपवलं.

कोल्हापुरात एका पत्नीने आपल्या पतीची हत्या केली आहे. दारु पिऊन पती सतत त्रास द्यायचा, पैसे मागायचा, याच रागातून या पत्नीने पतीची हत्या केल्याची माहिती आहे.दारू पिऊन सतत त्रास देणाऱ्या नवऱ्यावर पत्नीने रागाच्या भरात चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरातील गडहिंग्लज तालुक्यातील लिंगनूर येथे घडली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी पत्नी प्रणिता रमेश मोरे (वय वर्ष ३५) हिला गडहिंग्लज पोलिसांनी अटक केली. ही घटना गुरुवारी (8 मे) दुपारी उघडकीस आल्याची माहिती आहे.याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गडहिंग्लज तालुक्यातील लिंगनूर कानूल येथे राहणारा रमेश मोरे (वय ४२) हा गवंडीकाम करीत होता. मात्र, त्याला दारूचे प्रचंड व्यसन होते.

अलीकडच्या काळात कामधंदा ही नसल्याने त्याचकडे दारू पिण्यासाठी पैसे न्हवते. यामुळे तो नेहमी पत्नीकडे सतत पैसे मागत असत. तर, घर चालवायलाही पैसे नसल्याने त्यांच्यात सतत भांडणं होत असत. गुरुवारी दुपारीही बाराच्या सुमारास रमेश दारू पिऊन घरी आला आणि जेवून झोपला.रमेशची आई आपल्या लहान मुलाकडे गेली तर, मुलगा केदार हा यात्रेनिमित्त करंबळीला गेल्याचे पाहून, रमेश उठला आणि पत्नी प्रणिता भांडी घासत असताना तिला शिवीगाळ करू लागला, भांडण करू लागला. तसेच, प्लास्टिक पाईपने तिला मारहाण ही करण्यास सुरूवात केली. त्यामुळे प्रणिताने रागाच्या भरात घरातील चाकूने त्याच्या गळ्यावर वार केला. यामुळे रमेश रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला.

ही माहिती पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रमेशला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उशीर झाल्याने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.या घटनेनंतर पोलिसांनी पत्नी प्रणिताला ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरू केली आहे. रमेशने आपल्याला प्लास्टिक पाईपने मारहाण करत असताना झटापटीत हातातील चाकू त्याला लागला त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने आपण वार केले नाही, असं प्रणिताने पोलिसांसमोर स्पष्ट केलं आहे. मात्र, तरीही पोलीस वेगवेगळ्या बाजूने तपास करत आहेत. रमेशच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.