शेततळ्यात गेले तर परतलेच नाहीत, तरुणांसोबत दुर्दैवी घटना; शेत मजुरी करुन कुटुंबाला आधार देणाऱ्या लेकांचा करुण अंत.

जळगावातील पाचोरा तालुक्यात अंतुर्ली बुद्रुक येथे एका हृदयद्रावक घडना घडली आहे. दुर्घटनेत २१ वर्षीय आणि १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोघे शेतमजुरी करत असताना शेततळ्यात मृतावस्थेत आढळले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जळगावातील पाचोरा तालुक्यात अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली बुद्रुक येथील दोन मुलांचा मृत्यू झाला असून त्यांच्या निधनाने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. अंतुर्ली बुद्रुक शेती शिवारातील शेततळ्यात बुडुन एका २१ वर्षीय आणि एका १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.दोन मुलं शेततळ्यात बुडाली असल्याचा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी रुग्ण वाहिका चालक निळकंठ पाटील आणि सागर पाटील यांच्या मदतीने दोन्ही मुलांना बाहेर काढून तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं.

मात्र रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांना मृत घोषित केलं.पदमसिंह भगवान पाटील (वय – २१ वर्ष) रा. अंतुर्ली बुद्रुक ता. पाचोरा आणि रविंद्र परभत कोळी (वय – १४ वर्ष) रा. पुनगाव ता. पाचोरा हे दोघे शेत मजुरी करुन आपल्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ देत होते. दरम्यान ८ मे रोजी सकाळी ८ वाजता पदमसिंग पाटील आणि रविंद्र कोळी हे कामावर गेले होते.खूप वेळ झाला तरी घरी परत न आल्याने कुटुंबियांनी ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचा शोध सुरू केला. शोधादरम्यान सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अंतुर्ली शेत शिवारातील एका शेत तळ्यात दोघांचे मृतदेह आढळून आले.

दोन्ही तरुणांचा मृतदेह एकाच वेळी शेततळ्यात आढळ्याने एकच खळबळ उडाली.ग्रामस्थांच्या मदतीने आणि रुग्णवाहिका चालक निळकंठ पाटील आणि सागर पाटील यांच्या साहाय्याने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दोन्ही तरुणांना दाखल केलं. असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांचाही मृत्यू झाल्याचं सांगितलं. पदमसिंग पाटील याच्या पश्चात्य वृद्ध आई आणि एक विवाहित बहिण असं कुटुंब आहे. तर रविंद्र कोळी याच्या मागे कुटुंबात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काम करत असताना दोन्ही तरुणांचा शेत तळ्यात पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.