ऑपरेशन सिंदूर विरोधात सोशल मीडिया पोस्ट भोवली, देशविरोधी कारवायांप्रकरणी नागपुरात तरुणाला अटक.

पोलिसांच्या माहितीनुसार, सिदीकने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर भारतीय सैन्याच्या पाकिस्तानमधील “ऑपरेशन सिंदूर” व छत्तीसगडमधील “ऑपरेशन कगार” या नक्षलविरोधी मोहिमांवर टीका करणाऱ्या आणि भारत सरकारविरोधात द्वेष निर्माण करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या होत्या.भारताविरोधी आक्षेपार्ह लेखन करणाऱ्या एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली. केरळमधील पत्रकार आणि विद्यार्थी कार्यकर्ता रेजाज एम. शिबा सिदीक (वय २६, रा. एडपल्ली, एर्नाकुलम, केरळ) याला देशविरोधी कारवायांप्रकरणी नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध गंभीर कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रेजाज सिदीक ‘डेमोक्रॅटिक स्टुडंट्स असोसिएशन’ या संघटनेशी संबंधित असून, तो “मक्तूब मीडिया” आणि “दि ऑब्झर्व्हर पोस्ट” यांसारख्या माध्यमांतून जातीय भेदभाव, धार्मिक हिंसाचार, राज्य दडपशाही आणि वंचित समुदायांच्या प्रश्नांवर लेखन करतो. तो नुकताच दिल्लीला गेला होता. परतीच्या प्रवासात तो नागपूर येथे त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी थांबला असताना, पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे त्याला अटक केली.लकडगंज पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी(७ मे) रजास सिदीक याला अटक केली.

त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम १४९ (देशविरोधात युद्ध छेडण्याची तयारी), १९२ (दंगल घडवून आणण्याच्या हेतूने उत्तेजन देणे), ३५१ (गुन्हेगारी धमकी देणे), आणि ३५३ (अफवा पसरवून गोंधळ निर्माण करणे) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पोलिसांच्या माहितीनुसार, सिदीकने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर भारतीय सैन्याच्या पाकिस्तानमधील  व छत्तीसगडमधील “ऑपरेशन कगार” या नक्षलविरोधी मोहिमांवर टीका करणाऱ्या आणि भारत सरकारविरोधात द्वेष निर्माण करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या होत्या.

“ऑपरेशन सिंदूर मानवतेविरोधातील हल्ला आहे” असे आक्षेपार्ह विधानही त्याच्या मोबाईलमधून सापडले असल्याचीही माहिती आहे.तपासादरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून दहा आक्षेपार्ह पुस्तके, प्रतिबंधित माओवादी संघटनांशी संबंधित पत्रव्यवहार व लिखाण तसेच सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर जप्त केला आहे. गुप्तचर संस्थांनी सिदीकच्या मोबाइलवर बारीक नजर ठेवून मिळवलेली माहिती पोलिसांना देताच, मारवाडी चौक परिसरातील एका हॉटेलवर छापा टाकून त्याला अटक करण्यात आली. नागपूर पोलिस व अँटीनक्सल ऑपरेशन पथक सध्या रजास सिदीकची सखोल चौकशी करत असून, देशविरोधी कारवायांमध्ये त्याची भूमिका अधिक स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.