पाकिस्तानकडून LoCवर सतत फायरिंग, चार लहान मुलांसह १८ भारतीयांचा मृत्यू, पुंछमध्ये भयाण शांतता.

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून सीमेवर सतत गोळीबार करण्यात येत आहे. या हल्ल्यात १८ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सध्या सीमावर्ती भागातील गावात भयाण शांतता आहे. लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये ऑपरेशन सिंदूर राबवत एअर स्ट्राईक केला. यामध्ये ९ दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यात आलं. यानंतर पाकिस्तानी सैन्याकडून  वर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानने 788 किलोमीटर लांबीच्या LoC वर अनेक ठिकाणी तोफगोळे डागले.या हल्ल्यात पुंछ, तंगधार आणि LoC जवळच्या गावांमधील 18 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. यात चार लहान मुलांचाही समावेश आहे. भारतीय सैन्यानेही पाकिस्तानला तोफखान्याने जोरदार प्रत्युत्तर दिले.गुरुवारी (8 मे) पहाटे 4 वाजेपर्यंत दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू होता. त्यानंतरही अधूनमधून गोळीबार चालूच होता. भारतीय सैन्य कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे, असं सैन्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.सीमेवरील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. पुंछ जिल्ह्यात प्रशासनाने लोकांसाठी 9 निवारा केंद्रंही उभारली आहेत.

येथे लोकांना राहण्याची, जेवणाची आणि वैद्यकीय मदतीची सोय करण्यात आली आहे. तणावपूर्ण परिस्थितीमुळे जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी आणि पुंछमधील शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात आले होते. शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांनी पाकिस्तानी सैन्याने पुंछमधील गुरुद्वारावर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला. या हल्ल्यात 3 शीख लोकांचा मृत्यू झाला. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गुरुद्वाराला लक्ष्य केले आहे.पाकिस्तानी सैन्याने फक्त पुंछमध्येच नाही, तर जम्मू भागातील राजौरी जिल्ह्यातील काही भाग आणि कुपवाडा जिल्ह्यातील उरी, करनाह आणि तंगधार सेक्टरमध्येही गोळीबार केला. स्थानिकांनी या अंधाधुंद गोळीबाराला क्रूर आणि भ्याड हल्ला म्हटलं आहे. गोळीबारामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. हा गोळीबार रात्री सुमारे दोन वाजता सुरू झाला. त्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. स्फोटांच्या आवाजाने लोक जागे झाले आणि जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे धावू लागले.

परिस्थितीवर लक्ष ठेवून असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात तोफा आणि मोर्टारचा वापर केला. त्यांनी मनकोट, मेंढर, ठंडी कस्सी आणि पुंछ शहरातील अनेक गावे आणि लोकवस्तीच्या भागांना लक्ष्य केले.अंधाधुंद गोळीबारामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. गाड्या जळाल्या, दुकानांचे नुकसान झाले आणि रस्त्यावर रक्त पसरले दिसले. पुंछचा ऐतिहासिक किल्ला आणि काही जुनी मंदिरेही या हल्ल्यात अपघातग्रस्त झाली. एका अधिकाऱ्याने सांगितले, “निःशस्त्र नागरिकांवर हल्ला करणे हे शौर्य नाही, तर ते पाकिस्तानचे भ्याड कृत्य आहे.”तर, पुंछ शहरातील लोकांनी सांगितले की, रात्रभर गोळीबाराच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरला होता. लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत होते. स्थानिक रहिवासी मोहम्मद जाहिद यांनी सांगितलं की, “येथे युद्धासारखे वातावरण होते. जखमी लोक मदतीसाठी ओरडत होते आणि कुटुंबं सुरक्षित ठिकाणं शोधण्याचा रयत्न करत होती. सर्वत्र विनाशाचे दृश्य दिसत होते.”या घटनेमुळे सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय सैन्य परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.