पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर मिळणार! यावेळी फुल अन् फायनल फैसला, भारत आवळणार आर्थिक नाडी.

काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारताने अद्याप पाकिस्तानविरुद्ध कोणतीही लष्करी कारवाई केलेली नाही पण, आपल्या शत्रू देशावरील राजकीय आणि आर्थिक दबाव सतत वाढत आहे. याचा दिशेने आता भारत सरकार पुन्हा एकदा दुतर्फा कारवाईची तयारी सुरू आहे.नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अद्याप पाकिस्तानविरुद्ध कोणतीही लष्करी कारवाई केलेली नसली तरी, आर्थिक शस्त्राद्वारे शत्रू शेजाऱ्यावर सतत हल्लाबोल करत आहे. आधी सिंधू पाणी करार आणि द्विपक्षीय व्यापार थांबवून मोठा आर्थिक धक्का दिला तर आता पाकिस्तानला दोन्ही बाजूंने घेरण्याची तयारी सुरू आहे. मोदी सरकारचा हा निर्णय योग्य ठरला तर पाकिस्तानसाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का ठरेल आणि शत्रू देश अक्षरशः गुडघ्यावर येईल. भारताकडून आता पाकिस्तानची होणार दुहेरी कोंडी द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, यावेळी भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि वित्तीय कृती कार्य दल (FATF) कडे धाव घेतली आहे. IMF कडून पाकिस्तानला दिली जाणारी आर्थिक मदत थांबवण्याचा आणि पाकिस्तानला एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये टाकण्याचा भारताचा हेतू आहे.

एफएटीएफ एक जागतिक संस्था आहे, जी मनी लाँड्रिंग आणि दहशतवादी वित्तपुरवठ्यावर (टेरर फंडिंग) लक्ष ठेवते. जून 2018 मध्ये पाकिस्तानला ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकण्यात आले होते आणि ऑक्टोबर 2022 पर्यंत त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. एखादा देश ‘ग्रे लिस्ट’मध्ये असेल तर त्याच्या थेट परकीय गुंतवणुकीवर (FDI) परिणाम होतो.पाकिस्तानला यादीत टाकल्याने भारतात, विशेषतः जम्मू आणि काश्मीरमध्ये होणाऱ्या बेकायदेशीर टेरर फंडिंगला आळा बसल्याचा भारताने आधीच असा युक्तिवाद केला आहे.

 पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याच्या दुसऱ्या योजनेत जुलै 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने सुरू केलेल्या 8 अब्ज डॉलर्स (सुमारे 60 हजार कोटी रुपये) मदत पॅकेजवर आक्षेप घेणे आणि थांबवण्याचा प्रयत्न करण्याचा केंद्र तीळ मोदी सरकारचा प्रयत्न असेल. हे निधी पाकिस्तानकडून नापाक कारवाया आणि दहशतवादी हल्ल्यांसाठी वापरले जात असल्याचा भारतीय अधिकाऱ्यांनी युक्तिवाद केला.भारताला पाकिस्तानला FATF च्या ग्रे लिस्टमध्ये टाकायचे असेल तर आपल्याला इतर देशांचाही पाठिंबा मिळवावा लागेल. आर्थिक आघाडीवर कोणती पावले उचलता येतील यावर चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. FATF मध्ये पाकिस्तानला ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकण्याचा विचार सुरू असून FATF मध्ये कोणत्याही देशाविरुद्ध नामांकन प्रक्रिया सुरू करण्यासाठी पूर्ण मान्यता आवश्यक असते आणि भारत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.FATF मध्ये 40 सदस्य देश आणि 200 हून अधिक अधिकार क्षेत्रे आहेत. आतापर्यंत भारताला सुमारे 23 FATF सदस्य देशांकडून शोक संदेश मिळाले आहेत ज्यात ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, युरोपियन कमिशन, सौदी अरेबिया आणि UAE सारख्या आखाती सहकार्य परिषदेच्या देशांचे प्रमुख यांचा समावेश आहे. दुसरीकडे, पाकिस्तान FATF चा सदस्य नाही पण FATF ची सर्वात मोठी प्रादेशिक संस्था,आशिया पॅसिफिक ग्रुप ऑन मनी लाँडरिंग (APG) चा भाग आहे. भारत APG आणि FATF दोन्हीचा सदस्य आहे. मे महिन्यात होणाऱ्या IMF मंडळाच्या बैठकीत भारत पाकिस्तानविरुद्ध आक्षेप घेण्याचा विचार करत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.