‘दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची सुतराम शक्यता नाही’; काका-पुतण्या मनोमीलनाचं चित्र, पण पवारांच्या नेत्याने फुगा फोडला.

महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट आहेत. हे दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या बातम्या येत होत्या. शरद पवार गटाच्या नेत्याने शक्यतांना पूर्णविराम दिला आहे. अजित पवार भाजपची साथ सोडून महायुतीतून बाहेर पडल्यासच एकत्र येण्याचा विचार होऊ शकतो, असे ते म्हणाले. राजकारणात मतभेद असले तरी, पवार कुटुंबीय अनेकदा एकत्र आले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.महाराष्ट्रामधील दोन मोठ पक्ष फुटले आणि त्यांचे दोन गट तयार झाले. राजकारणामध्ये भूकंप आणणाऱ्या बंडखोरीनंतर निवडणुकीतही चुरस वाढली होती. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी भरघोस मते मिळवत पुन्हा भाजपसोबत सरकार स्थापन केले. ठाकरे गट आणि शिंदे गटामधील नेते एकमेकांवर टीका टिपण्णी करत असतात.

मात्र हेच दुसरीकडे म्हणजे राष्ट्रवादीमध्ये पाहायला मिळत नाही. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही काका-पुतण्यांची राष्ट्रवादी एकत्र असल्याची चर्चा अनेकदा दबक्या आवाजामध्ये होत होती.मात्र आता उघडपणे राष्ट्रवादी एकत्र असल्याचा दावा केला जातोय. मात्र अधिकृतपणे यावर मोठे नेते काही बोलले नाहीत. मात्र अशातच या चर्चांणा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून पूर्णविराम देण्यात आला आहे.दोन्ही राष्ट्रवादी या एकत्र येतील याची सुतराम शक्यता नसल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी म्हटलं आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याबाबतच्या जाणीवपूर्वक बातम्या बरेच दिवसापासून पेरल्या जात आहेत. वास्तविक असे काहीही होण्याची सुतराम शक्यता नाही. केवळ अफवा असल्याचं विकास लवांडेंनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना लवांडे यांनी दोन्ही राष्ट्रवादी केव्हा एकत्र येऊ शकतात यावरही भाष्य केलं आहे.

दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा विचार तेव्हाच होऊ शकतो जेव्हा अजित पवार आणि मित्र मंडळी प्रतिगामी विचाराच्या भाजपची साथ सोडून महायुतीतून बाहेर पडतील, असं लवांडे म्हणाले.राजकारण बाजूला ठेवत पवार कुटुंबीय अनेकदा घरगुती कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसलं आहे. राजकीय वैर असलं तरी त्यांनी आपली रक्ताची नाती धरून ठेवली आहेत. आता ६ एप्रिलला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला पवार घराची एका देशाने पाहिली. त्यानंतर १२ एप्रिलला रयत शिक्षण संस्थेची बैठक आणि २१ एप्रिलला पुण्यातील साखर संकुल येथे तिसऱ्यांदा दोघे एकत्र आले होते. म्हणजे जवळपास १५ दिवसात काका-पुतण्या एकत्र आल्याने साहजिकच चर्चा होणार, मात्र नेमकं खरं काय ते त्यांनाच माहिती आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.