नाशिकमध्ये भीषण अपघात: पिकअपची चार वाहनांना धडक, भावासमोर बहिणीने सोडले प्राण.

अपघातावेळी पिकअप चालक दारूच्या नशेत होता, असं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलं आहे.भरधाव पिकअपने चार वाहनांना धडक दिल्याने नाशिकमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक तरुणी जागीच ठार झाली असून अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला असून पोलिसांनी अपघातग्रस्त पिकअपच्या चालकाला ताब्यात घेतलं आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री सोनवणे ही तरुणी तिच्या भावासोबत दुचाकीवरून जात होती. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेनंतर जयश्री आणि तिचा भाऊ सुमित हे दोघे दुचाकीवरून बाजूला पडले.

यावेळी रक्तबंबाळ झालेल्या जयश्रीचा जागीच मृत्यू झाला असून भाऊ सुमित सोनवणे जखमी झाला आहे.दरम्यान, पुढे जाऊन सदर पिकअपने आणखी दोन दुचाकी आणि एका चारचाकी वाहनालाही धडक दिली. या अपघातात दुसऱ्या दुचाकीवरील दोन तरुणही जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.अपघातानंतर पोलिसांनी पिकअप चालकाला ताब्यात घेतलं आहे.

यावेळी त्याच्याकडे चौकशी केली असता, वाहन चालवत असताना मांडीवर बसलेल्या माझ्या मुलाने अॅक्सेलेरेटरवर पाय दिल्याने अचानक वेग वाढला आणि हा अपघात झाल्याचा दावा चालकाने केला आहे. मात्र अपघातावेळी पिकअप चालक दारूच्या नशेत होता, असं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलं आहे. या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.