झाडाला गळफास लावून घेत १९ वर्षीय तरुणानं स्वत:चं जीवन संपवलं. निश्चित झालेला साखरपुडा मोडल्यानं त्यानं टोकाचं पाऊल उचललं. ठरलेला साखरपुडा आठवड्याभरात मोडल्यानं तरुणाला नैराश्यानं ग्रासलं होतं.लखनऊ: झाडाला गळफास लावून घेत १९ वर्षीय तरुणानं स्वत:चं जीवन संपवलं. निश्चित झालेला साखरपुडा मोडल्यानं त्यानं टोकाचं पाऊल उचललं. ठरलेला साखरपुडा आठवड्याभरात मोडल्यानं तरुणाला नैराश्यानं ग्रासलं होतं. त्यामुळे तो दु:खात होता. ही दुर्दैवी घटना बुधवारी घडली.उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधील मदिना कॉलनीमध्ये तरुणाचा मृतदेह गुरुवारी सापडला. जीव देण्यापूर्वी त्यानं एक व्हिडीओ तयार केला. त्यात त्यानं आपल्या परिस्थितीसाठी स्वत:च्या ३ मित्रांना जबाबदार धरलं. अनस असं मृत तरुणाचं नाव आहे. जीव देण्याआधी त्यानं व्हिडीओ शूट केला. टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी त्यानं व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. यानंतर त्यानं गळफास लावून घेत जीवन प्रवास संपवला. अनसनं त्याच्या मृ्त्यूसाठी जबाबदार धरलेले त्याचे तिन्ही मित्र तो राहत असलेल्या परिसरातच राहतात.










