बिबट्याने अंथरुणातून १० महिन्यांच्या बाळाला उचलून नेलं, आईकडून आरडाओरड, पण…

पुण्यातील दौंडमध्ये बिबट्याने एका १० महिन्यांच्या बाळाला उचलून नेलं आहे. सध्या वनविभागाकडून त्या बाळाचा शोध घेतला जात आहे.दौंड तालुक्यातील दहिटणे या गावामध्ये एक भीषण घटना घडली आहे. येथे एका १० महिन्याच्या बाळाला बिबट्याने उचलून नेलं आहे. अनेक तासांच्या शोधमोहिमेनंतरही वनविभागाला या बाळाला शोधण्यात यश आलेलं नाही. तर, आपलं बाळ आपल्याच डोळ्यांसमोरुन बिबट्याने नेल्याने आई-वडिलांच्या डोळ्यातील पाणी थांबत नाहीये. दहिटणे येथे एका मेंढपाळाच्या दहा महिन्यांचा मुलगा आण्विक भिसे (वय १० महिने) याला अंथरुणातून सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास बिबट्याने उचलून नेलं असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिबट्याने या बाळाला उसाच्या शेतात नेलं. धुळाजी भिसे असं या बाळाच्या वडिलांचं नाव आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी हे मेंढपाळ कुटुंब या परिसरात आपल्या बकऱ्या घेऊन चारण्यासाठी आले होते,

अशी माहिती आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, रामभाऊ गायकवाड यांच्या उसाच्या शेतात धुळाजी भिसे हे मेंढ्या चरायला आहेत. बाळाला झोपवल्यानंतर त्याची आई अक्षय्य तृतीयेचा स्वयंपाक करण्यासाठी शेजारील पालावर गेली होती. तेवढ्यात या मेंढपाळाच्या दहा महिन्याच्या मुलाला बिबट्याने उचलून नेलं. सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आपल्या बाळाला बिबट्याने उचलून नेल्याचं दिसताच त्या बाळाच्या आईने जोर जोरात आरडाओरडा केला. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही आणि या बाळाला घेऊन बिबट्याने उसाच्या शेतात धूम ठोकली.

ही धक्कादायक घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली व ग्रामस्थांनी याची माहिती वन विभागातील कर्मचाऱ्यांना कळवली व वनविभागाचे कर्मचारी व यवत पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. सकाळपासून वनविभाग आणि पोलीस संयुक्तपणे बिबट्याचा शोध घेत असून आत्तापर्यंत आलेल्या वृत्ताप्रमाणे बिबट्याचा व बाळाचा शोध लागलेला नाही.सकाळच्या दिनचर्येप्रमाणे हे मेंढपाळ बांधव आपली काम करत होते, यावेळी हे लहान बाळ अंथरुणामध्ये झोपले होते, यावेळीच दबा धरून असलेल्या बिबट्याने डाव साधला आणि ही भयंकर घटना घडली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.