बारामतीमध्ये ३६ वर्षातील ऐतिहासिक निकाल, दौंडच्या नरवार हत्या प्रकरणात १२ जणांना जन्मठेप.

बारामती न्यायालयाने एका महत्त्वाच्या खटल्याचा निकाल दिला आहे. दौंडमधील एका हत्ये प्रकरणात न्यायालयाने मोठा निर्णय दिला. या प्रकरणात न्यायालयाने १२ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. चार सख्ख्या भावांसह तीन महिलांना शिक्षा झाली आहे. बारामतीच्या जिल्हा व सत्र न्यायालयात ३६ वर्षात पहिल्यांदाच एका खुनाच्या खटल्यात १२ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दौंड मध्ये झालेल्या खुनाच्या खटल्याची सुरुवात बरोबर सात वर्षांपूर्वी झाली होती. ३ मे २०१८ रोजी घडलेल्या या खुनाच्या घटने प्रकरणी ४ सख्ख्या भावांना आणि ३ महिलांसह बारा जणांना बारामतीच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे.३ मे २०१८ रोजी दौंड येथील विनोद नरवाल हे दुचाकीवरून जात होते. दुचाकी वरुन जात असताना दौंड शहरातीलच रवी जयप्रकाश टाक, सुजित जयप्रकाश टाक, संजीत जयप्रकाश टाक, रणजीत जयप्रकाश टाक या ४ भावांसह माधुरी संचित टाक,

मयुरी संगीत टाक, बबलू हिरालाल सरवान, आकाश उर्फ छोटू दीपक बेहोत, नरेश प्रकाश वाल्मिकी, सुरेश हिरालाल सरवान, शोभा किशोर वाल्मिकी, विकी नरेश वाल्मिकी आणि इतरांनी तलवार, कोयता, लोखंडी पाईप, दगड अशा धारदार शस्त्रांनी विनोद नरवाल यांना मारहाण केली होती.या मारहाणीच्या घटनेत विनोद नरवाल हे गंभीर जखमी झाले होते. घटनेनंतर त्यांना तात्काळ दवाखान्यात नेलं जात होतं. मात्र वाटेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. मारहाणीनंतर, विनोद यांची हत्या केल्यानंतर तत्कालीन सहाय्यक निरीक्षक गजानन जाधव यांनी १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील यांच्यासमोर चालली.

विशेष सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी सरकारच्या वतीने युक्तिवाद केला. या खटल्यामध्ये ८ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील प्रसन्न जोशी यांना सरकारी वकील डी. एस शिंगाडे, एडवोकेट मंगेश देशमुख यांनी सहकार्य केलं.बचाव आणि सरकारी पक्षाचा व्यक्तिवाद ऐकून सरकारी पक्षाचा युक्त ग्राह्य धरत न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील यांनी वरील १२ जणांना जन्मठेप आणि प्रत्येकी २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या दंडातील पाच लाख रुपयांची रक्कम विनोद नरवाल यांच्या पत्नी मीना नरवाल यांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.