17 वर्षांपासून भारतात वास्तव्य, पाकिस्तानची सीमा पार करण्याची वेळ आली, अन् वृद्धाने भारतविरहातून प्राण सोडले.

 पाकिस्तानात पाठवल्या जाणाऱ्या एकता वृद्ध व्यक्तीचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ६९ वर्षीय अब्दुल वाहिद यांना जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी श्रीनगरहून अमृतसरला आणले होते. त्यांना पाकिस्तानला परत पाठवायचे होते. वाहिद १७ वर्षांपासून भारतात राहत असल्याची माहिती आहे.जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचं चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आणि पाकिस्तानला धडा शिवकण्यासाठी भारताने पाकविरुद्ध काही मोठी राजकिय पावलं उचलली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पाकिस्तानी नागरिकांना दिले जाणारे सर्व अल्पकालीन व्हिसा रद्द करणे. त्यामुळे भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडून पाकिस्ताना जावं लागत आहे. २९ एप्रिल २०२५ रोजीपर्यंत पाकिस्तान नागरिकांना भारत सोडण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, यादरम्यान एक दु:खद घटना घडली आहे.

भारताच्या निर्णयानंतर एका ६९ वर्षीय व्यक्तीलाही पाकिस्तानात परतावे लागणार होते. परंतु तो त्याच्या देशात पोहोचण्यापूर्वीच बुधवारी (३० एप्रिल) त्याला हृदयविकाराच्या झटका आला आणि त्यातच त्याचं निधन झालं.अब्दुल वाहिद असं या व्यक्तीचं नाव होतं. त्याला जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी श्रीनगरहून पाकिस्तानला परत पाठवण्यासाठी आणले. तो गेल्या १७ वर्षांपासून भारतात राहत होता आणि पोलिसांना त्याचा व्हिसाची मुदत संपल्याचे आढळले. त्यामुळे त्याला त्याच्या देशात परत पाठवण्याची तयारी सुरू होती.

मात्र, त्याला त्याच्या देशात सोडणार त्यापूर्वी त्याला हॉर्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला.एकूण २२४ भारतीय नागरिक आणि पाकिस्तानी नागरिक, ज्यांच्याकडे नो ऑब्लिगेशन टू रिटर्न टू इंडिया व्हिसा होता, त्यांनी अटारी सीमेवरील एकात्मिक चेक पोस्ट द्वारे भारतात प्रवेश केला. तर, १३९ पाकिस्तानी नागरिक दुसऱ्या बाजूला गेले.गेल्या आठवड्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, केंद्राने अनेक निर्णय घेतले, ज्यात सिंधू पाणी करार निलंबित करणे, इस्लामाबादशी राजनैतिक संबंध कमी करणे आणि अल्पकालीन व्हिसावर असलेल्या सर्व पाकिस्तानींना भारत सोडण्याचे आदेश देणे किंवा कारवाईला सामोरे जाणे समाविष्ट आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.