पहलगमा हल्ल्यातील मुख्य आरोपी हाशिम मुसा हा अद्यापही पहलगाममध्येच असल्याची माहिती समोक आली आहे. त्याला लपण्यासाठी त्याचे आका मदत करत असल्याचंही कळतंय.पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मुख्य गुन्हेगार हाशिम मुसाचे हँडलर त्याला काश्मीरमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. यासाठी ते त्यांच्या स्थानिक ओव्हरग्राउंड वर्कर मॉड्यूलचा वापर करू शकतात. हाशिम आणि त्याचे साथीदार त्यांच्या हँडलरशी संपर्क साधण्याचा सतत प्रयत्न करत आहेत, असं सुरक्षा एजन्सींना वाटतं.सूत्रांच्या माहितीनुसार, दहशतवादी हे पहलगामच्या २५-३० किलोमीटरच्या परिसरातच कुठेतरी लपले आहेत.










