राज्य सरकारने मोठी घोषणा करत पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. सरकारच्या या निर्णयाने पीडित कुटुंबांना आधार मिळणार आहे. या घोषणेमुळे सरकारचं कौतुक केलं जात आहे.राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.
पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. त्याशिवाय, सरकार पीडित कुटुंबातील मुलांच्या शिक्षण आणि रोजगाराकडे लक्ष देणार असल्याचंही राज्य सरकारने सांगितलं आहे.
राज्य सरकारने मोठी घोषणा करत पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. सरकारच्या या निर्णयाने पीडित कुटुंबांना आधार मिळणार आहे. या घोषणेमुळे सरकारचं कौतुक केलं जात आहे.त्याशिवाय, आसावरी जगदाळे यांना सरकारी नोकरी दिली जाणार असल्याचाही निर्णय घेतला गेला आहे.









