नांदेडच्या वाळू माफियांची मुजोरी; कारवाईदरम्यान नायब तहसीलदारावर हल्ला; एकाला अटक.

नांदेडचे नायब तहसीलदार स्वप्नील दिग्गलवार हे आपल्या पथकासमवेत वाडी पाटी येथे कारवाई करण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर वाळू माफियांनी दगडफेक केली.जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात पोलिस प्रशासनाने वाळू माफियांविरुद्ध कारवाई सुरू केली असली, तरी शनिवारी रात्री नायब तहसीलदाराच्या पथकावर वाळू माफियांनी हल्ला चढवला. रविवारी या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेची वाच्यता होऊ नये याची काळजी महसूल व पोलिस प्रशासनाने घेतली.नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील वाळू घाटांचा लिलाव प्रलंबित आहे. महसूल मंत्र्यांच्या आदेशानंतर पोलिस यंत्रणेने वाळू माफियांविरुद्ध कारवाई सुरू केली असली, तरी त्यांची मुजोरी मात्र कमी झाली नाही. सिडको, सोनखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी कारवाया केल्या असल्या, तरी लिंबगाव, मुदखेड, भोकर, किनवट, हिमायतनगर, माहूर, नाळेश्वर, राहटी, शंखतीर्थ या भागातून अवैधरित्या वाळू उपसा सुरूच आहे.

विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा या व्यवसायात समावेश असल्याने कारवाया करताना प्रशासनही हतबल होत आहे. शनिवारी रात्री नांदेडचे नायब तहसीलदार स्वप्नील दिग्गलवार हे आपल्या पथकासमवेत वाडी पाटी येथे कारवाई करण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर वाळू माफियांनी दगडफेक केली. त्यांच्या समवेत दोन तलाठी, कौतवाल व पोलिस कर्मचारी होते.दगडफेक केल्यानंतर संबंधित वाळू माफियांनी पथकाने पकडलेला हायवा पळवून नेला. हायवा गाडी लातूर जिल्ह्याच्या पासिंगची होती.शहरातील असर्जन, विष्णुपुरी भागात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत आहे. त्याच्या तक्रारी आल्यानंतर कारवाई करण्यासाठी हे पथक गेले होते.

त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नसले, तरी महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत. घडलेल्या प्रकारानंतर नायब तहसीलदार स्वप्नील दिग्गलवार यांनी ग्रामीण पोलिस ठाणे गाठले. तेथे रीतसर तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. हायवा गाडी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी दिली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.