अमली पदार्थप्रकरणी मोठी कारवाई; नवी मुंबईत दोन पोलिस अटकेत, ​व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून धक्कादायक पुरावे समोर.

सचिन भालेराव आणि संजय फुलकर अशी अटक झालेल्या दोन पोलिसांची नावे आहेत. फुलकर हा नवी मुंबईच्या अमली पदार्थ विरोधी कक्षामध्ये, तर भालेराव हा खारघर पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.अमली पदार्थांच्या तस्करीतील गुन्हेगारांसोबत नवी मुंबई पोलिस दलातील दोन पोलिसांचे संधान आढळून आल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भात अन्य पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी आत्महत्या केलेल्या बिल्डर गुरुनाथ चिंचकर यांच्या मुलाच्या अमली पदार्थ तस्करी प्रकरणातच या पोलिसांचा संबंध आढळून आला आहे.सचिन भालेराव आणि संजय फुलकर अशी अटक झालेल्या दोन पोलिसांची नावे आहेत. फुलकर हा नवी मुंबईच्या अमली पदार्थ विरोधी कक्षामध्ये, तर भालेराव हा खारघर पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. याप्रकरणी आणखी काही पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमित काळे यांनी दिली. पाच दिवसांपूर्वीच नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक चिंचकर यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती.

चिंचकर यांच्या दोन्ही मुलांचा अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीत सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले होते. गेल्या महिन्यात नवी मुंबईत दाखल झालेल्या एका गुन्ह्यात चिंचकर यांचा दुसरा मुलगा धीरज याचा सहभाग आढळून आला होता.याच प्रकरणात नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला धीरजसोबत फुलकर व भालेराव यांचा थेट संबंध असल्याचे समजले होते. त्यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅटवरून याचे पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाईचा निर्णय घेतला व गुन्हे शाखेने रविवारी दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली. त्यानंतर रविवारी रात्री उशिरा या दोघांना अटक करण्यात आली. तर अन्य पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे.या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांकडून गुप्तता राखण्यात येत असून,

या गुन्ह्यात आणखी काही अधिकारीही गुंतले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.नवी मुंबईतील कारवाया सन २०२३ या वर्षात अमली पदार्थविरोधी कारवाईत ३५३ आरोपींना अटक करून २१ कोटी १३ लाख रु.चे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. तर नोव्हेंबर, २०२४मध्ये तळोजात केलेल्या कारवाईत दोन नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेऊन पाच कोटी ६२ लाख रुपयांचे मेफेड्रोन व कोकेन जप्त करण्यात आले होते. याशिवाय २९ मार्च रोजी वाशीमधील छाप्यात आफ्रिकेच्या देशांतील १४ नागरिकांची धरपकड केली होती. विशेष म्हणजे या १४ जणांच्या व्हिसा आणि पासपोर्टची मुदत देखील संपल्याचे पोलिसांना आढळून आले होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.