वांद्र्यातील क्रोमा शोरुमला भीषण आग, इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक.

 मुंबईच्या वांद्रे पश्चिमेकडील क्रोमा शोरुमला भीषण आग लागली. पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत. आगीमुळे शोरुममधील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मोठे नुकसान झाले.मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील क्रोमा शोरुमला आग लागल्याची घटना घडली आहे. मंगळवारी पहाटे ४ वाजता ही आग लागल्याची माहिती आहे. सकाळपासूनच या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग इतकी मोठ्या प्रमाणात पसरली होती, की शोरुममधील सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या आहेत.
वांद्रे पश्चिम येथील लिंकिंग रोडवरील लिंक स्क्वेअर मॉलच्या तिसऱ्या मजवल्यावर क्रोमा इलेक्ट्रॉनिक शोरुम आहे. या क्रोमा शोरुमला पहाटे ४ वाजता आग लागली. लेव्हल ४ ची ही आग असल्याची माहिती मिळते आहे. पहाटेच्या वेळी आग लागल्याने या मॉलमध्ये कोणीही नव्हतं.

त्यामुळे जिवितहानीचा मोठा धोका टळला. मात्र क्रोमा शोरुममधील इलेक्ट्रिक वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून आगीत वस्तू जळून खाक झाल्या आहेत.क्रोमा शोरुमला आग लागल्यानंतर ही आग मोठ्या प्रमाणात भडकली आणि त्या तिसऱ्या मजल्यावरील इतरही पसरली. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने, पहाटेची वेळ असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.अग्नीशमन दलाच्या १५ गाडया घटनास्थळी पोहोचल्या आहेत. क्रोमा शोरुम असलेल्या मॉलमधून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर येत आहे. क्रोमा शोरुमला आग लागल्यानंतर ही आग इतर वस्तूंच्या दुकानांपर्यंत पोहोचली. इतर दुकानं ही कपडे, चपला-बूट यांची होती.

त्यामुळे आग अधिकच भडकली.अग्निशमन दलाच्या हलगर्जीपणामुळे ही आग भीषण झाल्याचा आरोप अजित पवार राष्ट्रवादी गटाचे नेते झिशान सिद्दीकी यांनी केला आहे. नंतर या आगीचा काय रिपोर्ट येईल माहिती नाही, पण सकाळी ४ वाजल्यापासून मी आणि इतर नागरिक इथे आहेत. क्रोमाच्या बेसमेंटमध्ये लहानसा स्पार्क झाला होता. त्यानंतर आम्ही अग्निशमन दलाला अजून पाणी मागवा अशा १०० विनंत्या केल्या, त्यांच्याकडे आग विझवण्यासाठी गरजेची लागणारी साहित्य नव्हती, होती ती त्यांना वापरता येत नव्हती. आग लागल्यानंतर मॉलचा मागचा भाग आगीच्या विळख्यात आला नव्हता. अग्निशमन दलाला तिथे पाणी पोहोचवण्याची विनंती केली. त्यांना विनंती करुन तिथे पाणी पोहोचलं, मात्र त्यांना ते साहित्य वापरता येत नव्हतं, असा आरोप झिशान सिद्दीकी यांनी केला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.