उशीने पतीचं तोंड दाबलं, रात्रभर बॉडीच्या शेजारी बसून राहिली; सुनेचं भयानक कृत्य पाहून सासू हादरली.

पती-पत्नीच्या वादाचा भयंकर अंत झाला आहे. एका पत्नीने रागाच्या भरात आपल्या पतीची हत्या केली. त्यानंतर ती रात्रभऱ आपल्या पतीच्या मृतदेहाशेजारी बसून राहिली.एका महिलेने आपल्या पतीची हत्या केली, त्यानंतर ती रात्रभर पतीच्या मृतदेहाशेजारी बसून राहिली. पंजाबमधील पटियाला येथून हत्येची ही धडकी भरवणारी घटना समोर आली आहे. या पत्नीने पतीचा उशीने तोंड दाबून खून केला आणि त्यानंतर ती अनेक तास त्याच्यासोबत खोलीत राहिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. तसेच, आरोपी महिलेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. हरप्रीत सिंह असं मृत पतीचं नाव असल्याची माहिती आहे.पटियालाच्या बल्लमगड गावात एका पत्नी वीरपाल कौरने उशीने तोंड दाबून पतीची हत्या केली आहे. मृताची आई हरपाल कौर यांनी सांगितले की, 24 एप्रिलला त्यांचा मुलगा दारूच्या नशेत होता.

रात्री 9 वाजता त्याची पत्नी त्याला खोलीत घेऊन गेली आणि दुसऱ्या दिवशी 25 एप्रिलला तो खोलीतून बाहेर आला नाही. संपूर्ण दिवस उलटला तरी तो खोलीतून बाहेर पडला नाही. संध्याकाळी त्यांनी मुलाला फोन केला असता त्याने फोन देखील उचलला नाही. तेव्हा त्यांनी नातवाला त्यांच्या खोलीत पाठवले, तिथे नातवाने पाहिले की हरप्रीत सिंह हा निपचित पडलेला होता.मृत हरप्रीतच्या डोक्यासह शरीराच्या अनेक भागावर जखमेच्या खुणा होत्या. मृताच्या आईने तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस आणि एफएसएलची टीम घटनास्थळी पोहोचली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुरावे गोळा करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मृताची आई हरपाल कौर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पत्नी वीरपाल कौरविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करुन तिला अटक केली आहे.हरपाल कौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा २९ वर्षीय मुलगा हरप्रीत आणि त्याच्या पत्नीमध्ये नेहमी वाद होत असत.

वीरपाल कौर आपल्या मुलांनाही मारहाण करायची. २४ एप्रिललाही हरप्रीत सिंह कामावरुन परत आल्यानंतर त्याने रात्री जेवण मागितले, तेव्हा वीरपालने वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघेही त्यांच्या खोलीत गेले. २५ एप्रिलला खोलीचं दार उघडलं नाही. जेव्हा नातवाने जाऊन पाहिलं तेव्हा हरप्रीत हा मृतावस्थेत बेडवर होता.याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, हरप्रीत हा बेडवर मृतावस्थेत पडला होता. तर, वीरपाल त्याच्या बाजुला बसलेली होती. वीरपाल कौरने सांगितलं की तिने उशीने तोंड दाबून त्याची हत्या केली.आरोपी पत्नी वीरपाल कौर मानसिक आजारी असून पोलिसांनी तिला अटक केली आहे. या घटनेची माहिती देताना सदर पोलीस स्टेशनचे प्रभारी विक्रमजीत सिंह यांनी सांगितले की, पोलिसांनी हरप्रीत सिंगचा मृतदेह ताब्यात घेतला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.