आता कारागृहातच होणार सुसज्ज कोर्टरुम; ‘व्हीसी’चे युनिटही वाढणार, सव्वाचार कोटींचा निधी मंजूर.

आता कारागृह परिसरातच नवीन सुसज्जित कोर्टरूमची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी जागा निश्चित झाली असून, शासनाने निधीही मंजूर केला आहे.न्यायालयात पेशीदरम्यान बंदीवानांमध्ये होणारी हाणामारी टळावी, वेळ व इंधनच्या बचतीसह वेळेत निकाल लागावा याकरिता आता कारागृह परिसरातच नवीन सुसज्जित कोर्टरूमची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी जागा निश्चित झाली असून, शासनाने निधीही मंजूर केला आहे.लवकरच कारागृहात न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू होणार आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहाची बंदीवान क्षमता १,९४० असून सध्या येथे तीन हजारांपेक्षा अधिक बंदीवान चित्र आहेत. यापैकी तब्बल सव्वाशे कुख्यात, आक्रमक बंदीवान आहेत. त्यांच्याभोवती कारागृहात सुरक्षेचे जाळे अधिक घट्ट विणण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वीच गृहविभागाने कारागृह परिसरात नवीन कोर्टरूमच्या बांधकामासाठी २ कोटी १ लाख ९८ हजार ६६१ रुपये तर कारागृहातील व्हिडीओ कॉन्फरन्स कक्षाच्या विस्तारीकरणासाठी २ कोटी २२ लाख ६२ हजार ११२ असा एकूण ४ कोटी २४ लाख ६० हजार ७७३ रुपयांचा निधी मंजूर केला.कोर्टरूममध्ये न्यायाधीशांचे चेम्बर, आरोपी व साक्षीदारांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी कठडे, न्यायालयात आवश्यक त्या सर्वच सुविधा, वकिलांसाठी वेगळी खोली, शौचालय आदींसह अत्याधुनिक सुविधांनी ही इमारत सुसज्ज असेल. सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतचा आराखडा व कारागृहातील जागाही निश्चित केली आहे. सध्या कारागृहात व्हिडीओ कॉन्फरन्सचे २२ युनिट आहेत.

या युनिटवाढीसाठी २ कोटी २२ लाखांचा निधी मंजूर झाल्याने यात वाढ होऊन ती ५० वर जाईल. त्यामुळे बंदीवानांना नातेवाइकांशी संवाद साधणे अधिक सोयीचे होईल.गंभीर प्रकरणे वगळता अन्य खटल्यांत बंदीवानांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर करणे आवश्यक नसते. नवीन कोर्टरूम व व्हिडीओ कॉन्फरन्स कक्षाच्या विस्तारीकरणानंतर कारागृहाचे मनुष्यबळ वाचेल. याशिवाय, सुविधेत भर पडून तारखेवरच न्यायालयाचे कामकाज होईल. सार्वजनिक बांधकामद्वारे गृहविभागाला प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यासाठी गृहविभागाने निधीही मंजूर केला. लवकरच बांधकामाला सुरुवात होईल, अशी माहिती कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे यांनी ‘मटा’ला दिली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.