पुणे विमानतळावर प्रवाशांना स्वस्त दरात चहा, कॉफी, पाणी आणि वडापाव मिळावेत यासाठी ‘उडान यात्री कॅफे’ सुरू करण्यात आले आहे. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन झाले. विमानतळावर स्वस्त दरात पदार्थ मिळणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनल येथे प्रवाशांना पिण्याचे पाणी, चहा, कॉफी, वडापाव स्वस्तात मिळावा, यासाठी ‘उडान यात्री कॅफे’ सुरू करण्यात आला आहे. या कॅफेचे उद्घाटन केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी केले. या ठिकाणी वडापाव २० रुपये, पाणी बॉटल १० रुपये आणि चहा १० रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांना कमी दरात पदार्थांची चव चाखता येणार आहे. ‘उडान कॅफे’ सुरू होणारा पुणे विमानतळ देशात चौथा आणि राज्यात पहिला ठरला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार देशात अनेक विमानतळांवर ‘उडान यात्री कॅफे’ सुरू करण्यात येत आहे. सध्या देशात कोलकाता, चैन्नई, अहमदाबाद आणि आता पुण्यात ‘उडान यात्री कॅफे’ सुरू झाले आहे. त्यामुळे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना आता स्वस्तात चहा-कॉफी उपलब्ध झाली आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिला मिळाला असून, कमी दरात चहा, कॉफी, पाणी बाटली, वडापाव, समोसा यांची चव चाखता येणार आहे. पुण्यानंतर मुंबई येथे ‘उडान कॅफे’ सुरू केले जाणार आहे.’उडान यात्री कॅफे’चे उद्घाटन केल्यानंतर विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार बापूरसाहेब पठारे व सल्लागार समितीच्या सदस्यांनी पैसे देऊन येथून वडापाव खरेदी करून त्याची चव घेतली. त्यानंतर प्रवाशांनी खाद्यपदार्थ घेण्यासाठी कॅफेवर गर्दी केल्याचे दिसले. महिला कर्मचारीच हा कॅफे चालविणार आहेत.पुण्याहून वाराणसीला निघालो आहे. पुणे विमानतळावर ‘उडान यात्री कॅफे‘ सुरू झाल्यानंतर स्वस्तामध्ये खाद्यपदार्थ मिळतात हे समजले.









