डॉ. शिरीष वळसंगकरांची म्युच्युअल फंडात 160 कोटी रुपयांची गुंतवणूक, वारसांना मिळणार तब्बल 300 कोटी.

 सोलापुरातील न्यूरो फिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी म्युच्युअल फंडात गेल्या १५ वर्षात तब्बल १६० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे, न्यूरो फिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येनंतर वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे. ज्या डॉक्टरांनी हजारो रुग्णांच्या मेंदूवर उपचार केले, त्याच डॉक्टरांना मेंदूत गोळी झाडून आपला जीव देण्याची वेळ का आली असा सवाल उपस्थित होत आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांनी वीस ते पंचवीस वर्षांत मोठं वटवृक्ष उभं केलं होतं. मागील 15 वर्षांत डॉ. शिरीष वळसंगकर यांनी म्युच्युअल फंडात सुमारे 160 कोटी रुपये गुंतवल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. ही गुंतवणूक एसआयपी या पद्धतीने केली आहे. एखाद्या व्यक्तीने मागील 15 ते 20 वर्षांत !60 कोटी रुपये गुंतवले असल्यास शेअर बाजाराच्या अनुषंगाने तिच्या वारसाला आता किमान 300 कोटी किंवा त्याहून अधिक रक्कम मिळणे शक्य असल्याचे गुंतवणूक तज्ज्ञांनी सांगितले. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, डॉक्टरांनी म्युच्युअल फंडात गेल्या 15 वर्षांत तब्बल 160 कोटी रुपये गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे.

डॉ. शिरीष वळसंगकरांनी ही गुंतवणूक करत असताना वारस म्हणून कोणाच्या नावाची नोंद केली आहे, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. डॉ. वळसंगकर यांचे मृत्युपत्र आणि वारसा असलेली कागदपत्रे दाखल केल्यानंतर संबंधितांना ती रक्कम मिळू शकणार आहे. पण, डॉ. शिरीष वळसंगकरांनी नॉमिनी म्हणून कोणाच्या नावाची नोंदणी केलेली आहे, याबाबत उत्सुकता लागली आहेप्रख्यात न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या मृत्यूने सोलापूरसह राज्यातील वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे. सोलापूरमधील पहिले न्युरोफिजिशियन डॉ. वळसंगकर यांनी रुग्णसेवेसोबत समाजसेवा करत अनेक रुग्णांवर मोफत उपचार देखील केले होते. अतिशय शांत स्वभावच्या डॉ. शिरीष वळसंगकरांनी अनेक रुग्णांना लळा लावला होता. 18 एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आपल्या आयुष्याची अखेर केली.

डॉ वळसंगकरांच्या आत्महत्येने वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे.डॉ. शिरीष वळसंगकरांनी एसपी न्यूरोसायन्स इन्स्टिट्यूट या रुग्णालयाची उभारणी केली होती. डॉ. शिरीष वळसंगकर यांनी एसपी न्यूरोसायन्स हा दवाखाना सोलापूरसह राज्यात नावारूपाला आणला होता. परंतु मृत्यूसमयी डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या हाती सध्या फक्त ‘ओपीडी’चेच अधिकार होते. ओळखीतील रुग्णाचे थोडे बिल कमी करण्यास डॉ. शिरीष यांनी सांगितले, तरीदेखील बिल कमी केले जात नव्हते. त्यांचे रुग्णालयातील अधिकार कमी केले होते, त्यांच्या शब्दाला किंमत राहिली नव्हती, अशी माहिती अटकेतील मनीषा माने यांनी पोलिसांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.