लेकीच्या लग्नात मिरवलं, दुसऱ्याच दिवशी काळाचा घाला; भीषण अपघातात नववधूच्या आईचा मृत्यू.

 या घटनेने ज्या घरात आनंदाचे वातावरण होतं त्याच घरात दुःखाचा हंबरडा ऐकू येत होता.अगदी उत्साहात मुलीचा विवाह पार पडला. सर्व कुटुंबीय आनंदात होते. दुसऱ्या दिवशी मुलाकडे जेवणाचा कार्यक्रम होता. मुलीला आणण्यासाठी आईसह कुटुंबीय निघाले होते. याचवेळी काळाने घात केला. ज्या वाहनाने ते निघाले होते त्या वाहनाच्या अपघात झाला. यात नववधूच्या आईचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर सात जण गंभीररित्या जखमी झालेत.या घटनेने ज्या घरात आनंदाचे वातावरण होतं त्याच घरात दुःखाचा हंबरडा ऐकू येत होता. ही दुदैवी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या तारसा बुज येथे घडली. छाया दिलीप चांदेकर ( वय 50 ) असे मृतक महिलेचे नाव आहे. मंदाबाई मोरेश्वर उरकुडे, चेतना सुरेश कुकुडकर, कर्णिका दिनेश धांडे, अश्विनी दिनेश धांडे, संगीता प्रकाश खोब्रागडे, प्रतीमा वाल्मीक भारशंकर, मोहन पश्रृजी तुमडे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.प्राप्त माहितीनुसार, तारसा बुज या गावातील छाया दिलीप चांदेकर यांचा मुलीचा विवाह गोंडपिपरी तालुक्यातील फुर्डीहेटी येथील युवकाशी झाला.

मोठ्या आनंदमय वातावरणात विवाह सोहळा पार पडला. दुसऱ्या दिवशी ( सोमवार ) मुलाकडे जेवणाच्या कार्यक्रम होता. याच दिवशी मुलीला माहेरी आणण्यासाठी चांदेकर कुटुंबीय निघाले होते.नवऱ्या मुलाच्या गावाकडे जात असताना भंगाराम तळोधी-विठ्ठलवाडा मार्गांवरील कोरंबी गावाजवळ वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. आणि अपघात झाला. या अपघातात नववधूच्या आईचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले आहेत.घटनेची माहिती मिळताच गोंडपिपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांनी घटनास्थळ गाठले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेने नववधू आणि वराकडील कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.दुसरीकडे, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कोळदा-खेतिया महामार्गावरील एक कंटेनर थेट ब्राह्मणपुरी गावातील रस्त्याच्या कडेला असलेल्या एका घरात घुसल्याने एक जण जागीच ठार, तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

सदरची घटना सोमवारी (दि. २८) पहाटेच्या सुमारास घडली आहे. घरातील एकमेव कर्तापुरुष गेल्याने कुटुंबीयांनी आक्रोश केला.ब्राह्मणपुरी गावातून जाणाऱ्या कोळदा-खेतिया राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी पहाटेच्या सुमारास एक मालवाहू कंटेनर (डीडी ०१ पी ९७३२) हा अचानक रस्त्याला लागून असलेल्या घराला धडकला. या अपघातात घराच्या अंगणात खाटेवर झोपलेल्या संजय ठाकरे (वय ४५) यांच्या अंगावरून कंटेनर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर जनाबाई ठाकरे ही महिला गंभीर जखमी झाली. या कंटनेरच्या अपघातात तीन ते चार घरांचे नुकसान झाले असून, एक टेम्पोसह दुचाकीचेदेखील नुकसान झाले आहे. या प्रकरणी शहादा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.