पती-पत्नीच्या वादाचा भयंकर अंत झाला आहे. एका पत्नीने रागाच्या भरात आपल्या पतीची हत्या केली. त्यानंतर ती रात्रभऱ आपल्या पतीच्या मृतदेहाशेजारी बसून राहिली.पटियाला : एका महिलेने आपल्या पतीची हत्या केली, त्यानंतर ती रात्रभर पतीच्या मृतदेहाशेजारी बसून राहिली. पंजाबमधील पटियाला येथून हत्येची ही धडकी भरवणारी घटना समोर आली आहे. या पत्नीने पतीचा उशीने तोंड दाबून खून केला आणि त्यानंतर ती अनेक तास त्याच्यासोबत खोलीत राहिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. तसेच, आरोपी महिलेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. हरप्रीत सिंह असं मृत पतीचं नाव असल्याची माहिती आहे.










