श्री चक्रधर स्वामी अवतार दिन निमित्त सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात स्वामीची प्रतिमा भेट.
भडगाव तालुका प्रतिनिधी : यशकुमार पाटील ; महानुभाव पंथ प्रवर्तक भगवान श्री चक्रधर स्वामी अवतार दिन प्रत्येक कार्यालयात साजरा करण्यात यावा या बाबत महाराष्ट्र शासनाने दिनांक २८ जानेवारी २०२४ च्या परिपत्रकात नमूद करण्यात आले असून दिनाक ०५ सप्टेंबर २०२४ गुरुवारी श्री चक्रधर स्वामी अवतार दिन जयंती निमित्त सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात भगवान श्री चक्रधर स्वामींची प्रतिमा शिवाळा अवस्थान मंदिराच्या वतीने भेट देण्यात आली त्यावेळी प्रतिमा पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले त्याप्रमाणे भडगाव पेठ भागातील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले श्रीक्षेत्र शिवाळा अवस्थान मंदिर पासून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी महंत देगावकर बाबा कनाशी, महंत सायराज बाबा कनाशी, महंत सारंगधर बाबा भडगाव, राहुलदादा पाचराउत कनाशी,सुरेषराज लांडगे कनाशी,अभयराज मानेकर भडगांव, दिपक पुजारी,भैय्या पुजारी, गोपाल पुजारी,निलेश पाटील, प्रविण पाटील, श्रीराम पवार, नितीन पवार, राहुल देवरे, भुषण पवार, रितेश पाटील, कुणाल पाटील, यासह सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मित्र मंडळाचे सदस्य, महानुभाव पंथीय व सतभक्त उपस्थित होते.