जळगांव तालुक्यातील शाळा व कॉलेज मुख्याध्यापक व प्राचार्य यांचे घेण्यात आलेल्या बैठकीबाबत.

जळगांव तालुक्यातील शाळा व कॉलेज मुख्याध्यापक व प्राचार्य यांचे घेण्यात आलेल्या बैठकीबाबत

अलीकडील काळात ठाणे शहरातील बदलापुर येथील शाळेतील कंत्राटाने नेमलेल्या कर्मचाऱ्याने तीन चार वर्षांच्या दोन लहान मुलींवर केलेल्या लैगिक अत्याचाराची घटना तसेच राज्यातील ईतर भागातही अशा प्रकारच्या घटना घडलेल्या असुन अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षा सर्वोतोपरी असल्याने उपरोक्त घटनांच्या पार्श्वभुमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आज दि. ०४/०९/८२०२४ रोजी सकाळी १०/०० ते ११/३० वा. दरम्यान पोलीस मुख्यालय येथील मंगलम हॉल येथे जळगांव तालुक्यातील सर्व प्रकारच्या जि.प.शाळा तसेच इंग्लीश मेडियम स्कुल यांचे मुख्याध्यापक व सर्व प्रकारचे कॉलेजेस चे प्राचार्य यांची मा. पोलीस अधीक्षक सो. जळगांव यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली असुन सदर बैठकीकरीता संदीप गावीत उपविभागीय पोलीस अधिकारी जळगांव भाग जळगांव तसेच उपविभागातील पो.स्टे. चे प्रभारी अधिकारी व शाळा व कॉलेजेसचे मुख्याध्यापक व प्राचार्य उपस्थित होते.

सदर बैठकी दरम्यान अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षा सर्वोतोपरी असल्याने उपरोक्त घटनांच्या पार्श्वभुमीवर जळगांव तालुक्यातील उपस्थित सर्व प्रकारच्या जि.प.शाळा तसेच ईग्लीश मेडियम स्कुल यांचे मुख्याध्यापक व सर्व प्रकारचे कॉलेजेस चे प्राचार्य यांना खालील प्रमाणे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे बाबत सुचना देण्यात आल्या आहेत. १. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन शाळेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत सुचना देण्यात आल्या.

२. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन पर्यवेक्षक यांची नेमणुक करण्याबाबत सुचना देण्यात आल्या. ३. शाळेतील कंत्राटी व अस्थायी कर्मचाऱ्यांचे चारित्र्य पडताळणी करुन घेण्याबाबत सुचना देण्यात आल्या. ४. शाळा परीसराला कंपाउंड करण्याबाबत सुचना देण्यात आल्या. ५. शाळांना सुरक्षा रंक्षक यांची नेमणुक करण्याबाबत सुचना देण्यात आल्या. ६. शाळेतील प्रसाधन गृहांच्या सुरक्षीततेच्या अनुषंगाने सुचना देण्यात आल्या. ७. प्रत्येक शाळा येथे तक्रार पेटी (Complaint Box) ठेवुन त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या तक्रारींच्या नोंदी ठेवण्याबाबत सुचना देण्यात आल्या. ८. शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत ने आण करणारे वाहन चालक यांचे चारित्र पडताळणी करुन घ्यावी व त्यांचे रेकॉर्डवर नोंदी घेण्यात याव्यात.

सदर बैठकी दरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातुन प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे बाबत सर्व उपस्थित मुख्याध्यापक व प्राचार्य यांना सुचना देण्यात आल्या असुन सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन शाळेच्या आवारात शालेय शिक्षण विभाग आणि महिला व बालविकास विभागाकडुन निर्गमित शासन निर्णयानुसार उपाययोजना करण्याबाबत सुचना देण्यात आल्या

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.