बापरे! बाईकला धडक अन् व्हॅन विहिरीत कोसळली, भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू, वाचवायला गेलेल्या तरुणाचाही जीव गेला.

कार विहिरीत पडून एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यावेळी या व्हॅनमधून १४ जण प्रवास करत होते.कार विहिरीत पडून भीषण अपघात झाला आहे.यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मध्यप्रदेशातील मदसौर येथील नारायणगडमध्ये ही दुःखद घटना घडली आहे. कचरिया चौपाटी येथे ही कार विहिरीत पडली. कारमध्ये 11 जण होते. विहिरीत पडलेल्या लोकांना वाचवण्याच्या प्रयत्नात मनोहर सिंग (वय ४० वर्षे) नावाच्या स्थानिक तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून बचावकार्य सुरू केले. रविवारी (२८ एप्रिल) हा अपघात झाल्याची माहिकी आहे.कारमध्ये 11 जण होते. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये कार स्वार, एक वृद्ध दुचाकीस्वार आणि अपघातातील लोकांना वाचवण्यासाठी उडी मारलेल्या तरुणाचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या कारने प्रथम दुचाकीला धडक दिली, त्यानंतर विहिरीत पडल्याची घटना घडली. विहिरीत पडल्यानंतर कारमधून एलपीजी गॅस गळती होऊ लागली, त्यामुळे आत अडकलेल्या लोकांचा श्वास गुदमरू लागला.एका स्थानिक तरुणाने कार स्वारांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याने विहिरीत उडी घेतली मात्र गॅसगळतीमुळे त्याचाही गुदमरून मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. एसडीओपी, पोलीस स्टेशन प्रभारी आणि एसडीएमसह अनेक अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. क्रेनच्या साहाय्याने गाडी आणि मृतांना बाहेर काढण्यात आले आहे.विहिरीतून एक महिला, एक लहान मुलगी आणि एका किशोरला जिवंत बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील सर्व लोक उज्जैन जिल्ह्यातील उनहेल तालुक्यातील रहिवासी होते. ते उन्हेलहून नीमचला जात होते, अशी माहिती आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.