कांद्याच्या दरात मोठी घसरण! शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकट, अनुदान देण्याची मागणी.

नाशिक जिल्ह्यात गत आठवड्यात कांद्याचे सरासरी बाजारभाव किमान ८०० रुपये, तर कमाल १००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहेत.कांद्यावरील निर्यात शुल्क कमी केल्यानंतर कांदा दरात उसळी अपेक्षित होती. मात्र, प्रत्यक्षात बाजारभावात मोठी घसरण होत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. नाशिक जिल्ह्यात गत आठवड्यात कांद्याचे सरासरी बाजारभाव किमान ८०० रुपये, तर कमाल १००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. गत आठवड्यात कांद्याची आवक सुमारे दीड लाख क्विंटल झाली असून, राज्यातील एकूण कांदा आवकमध्ये नाशिकचा सिंहाचा वाटा आहे. मात्र, कमी दरामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेनासा झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.गत आठवड्यात कांद्याला किमान ८४० रुपये, तर कमाल १२५० रुपये दर मिळाला. एप्रिलमधील तीव्र उष्णतेचा फटका कांद्याच्या प्रतवारीला बसत आहे.

वाढत्या तापमानामुळे कांद्याची गुणवत्ता खराब होत आहे. याशिवाय, काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानेही कांद्याचे नुकसान केले. परिणामी, शेतकरी आता कांद्याची प्रतवारी करण्यात गुंतले आहेत. चांगले बाजारभाव मिळण्याची वाट पाहत, प्रतवारी केलेला कांदा साठवून ठेवण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.उन्हाळी कांद्याची टिकवण क्षमता चांगली असल्याने, हा कांदा चाळींमध्ये साठविला जातो. शेतकरी चांगल्या प्रतीचा कांदा निवडून साठवतात आणि बाजारभाव वाढल्यानंतर तो विक्रीसाठी आणतात. एप्रिल-मे महिन्यांत साठविलेला कांदा जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये विक्रीसाठी बाजारात येतो. पावसाळ्यात कांद्याची आवक कमी झाल्याने या कालावधीत दरात वाढ होते. याच धोरणानुसार शेतकरी सध्या कांदा साठवणीवर लक्ष देत आहेत.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नुकतीच लासलगाव बाजार समितीला भेट देऊन केंद्र सरकारच्या आयात-निर्यात धोरणावर टीका केली. दि. १ एप्रिलनंतर विकल्या गेलेल्या कांद्याला प्रति क्विंटल १५०० रुपये अनुदान देण्याची मागणी राजू शेट्टी यांनी यावेळी केली.

गत आठवड्यात कांद्याला किमान ८०० रुपयेच दर कांद्याची आवक सुमारे दीड लाख क्विंटल एप्रिलमधील तीव्र उष्णतेचा कांद्याच्या प्रतवारीला फटका १ एप्रिलनंतर विकल्या गेलेल्या कांद्याला प्रतिक्विंटल १५०० रुपये
अनुदान देण्याची राजू शेट्टी यांची मागणीकांदा दरातील चढ-उतार आणि निर्यातीतील अनिश्चित धोरण याचा थेट फटका कांदा उत्पादकांना बसत आहे. निर्यात शुल्क कमी केल्यानंतरही अपेक्षित दरवाढ न झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शेतकऱ्यांनी सरकारने कांदा निर्यातीवर अनुदान द्यावे, अशी मागणी लावून धरली आहे. यामुळे कांदा उत्पादकांना आर्थिक दिलासा मिळेल आणि बाजारभाव स्थिर राहण्यास मदत होईल, असा त्यांचा दावा आहे.
कांदा उत्पादनाचा खर्चच निघत नाही. सरकारने तातडीने अनुदान जाहीर करावे. शेतकरी आता बाजारभावात सुधारणा होण्याची प्रतीक्षा करत असून, कांदा साठवणुकीवर भर देत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.