ओव्हरटेक करणं भोवलं, भरधाव वेगात बोलेरो ट्रकवर आदळली, गाडीचा चेंदामेंदा, चौघांचा जागीच अंत.

भंडाऱ्यात दोन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बोलेरो थेट ट्रकवर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला आहे.मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. भंडाऱ्याकडून नागपूरच्या दिशेने जात असलेल्या बोलेरो वाहन चालकाने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. ही घटना भंडारा नजीकच्या बेला येथील हॉटेल साई प्लाझा समोर घडली असून या अपघातात चार जणांच्या जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर रित्या जखमी झाल्याचे समजते. रविवारी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत.

मृतांमध्ये अशोक फुलचंद डेहरवाल (48 नागपूर), शैलेंद्र लेखाराम बघेले (34 नागपूर), शैलेश पन्नालाल (40 गोकुळपुरे वायुसेना नगर), मुकेश बिंजेवार (32 वाडी नागपूर) यांचा समावेश आहे. तर, अविनाश नाकतोडे असे जखमीचे नाव असल्याची माहिती आहे.याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, भंडारा बायपास मार्गाचे काम पूर्ण न झाल्याने जड वाहने शहरातूनच निघत आहेत. यातच बेला येथून चौपदरी मार्ग संपल्याने वाहतुकीची मारणारी लागलीच असते. अशात येथे अपघाताचे प्रमाण अधिकच वाढत चालले आहे. रविवारी रात्री बोलेरो गाडी क्र.

MH27 AR 6198 च्या चालकाने भंडाऱ्याकडून नागपूरच्या दिशेने जात असताना एका वाहनास ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी विरुध्द दिशेने येत असलेल्या UK18CA 8059 या ट्रॅकसोबत बोलेरोची जोरदार धडक झाली.ही धडक इतकी भीषण होती की त्यामध्ये बोलरोचा चेंदामेंदा झाला. तर बोलेरोमधील चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात एक व्यक्ती गंभीर रित्या जखमी झाला आहे. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली असून या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला देण्यात आली. रुग्णवाहिकेला पाचारण करून मृतदेह आणि जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.