अटारी-वाघा बॉर्डर बंद, पुरवठा थांबल्याने सुकामेव्याचे दर वाढले; पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय व्यापाऱ्यांवर मोठा परिणाम.

पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा सीमा बंद करण्यात आली आहे. यामुळे अफगाणिस्तानमधून होणारा सुक्या मेव्याचा पुरवठा थांबला आहे. बाजारात सुक्या मेव्याची आवक घटल्याने किमती १० ते १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अमृतसरमधील अटारी-वाघा सीमा बंद केली आहे. सीमा बंद झाल्यामुळे भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापारावरही परिणाम होऊ लागला आहे. या सीमा बंदमुळे गेल्या चार दिवसांपासून अफगाणिस्तानातून येणाऱ्या सुक्या मेव्याचा पुरवठा थांबला आहे. याचा परिणाम बाजारपेठेत दिसून येत आहे. व्यापाऱ्यांच्या मते, अफगाणिस्तानातून होणाऱ्या पुरवठ्यात अडथळा आल्यामुळे सुक्या मेव्याच्या किमती १० ते १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. पुढील एक महिना हीच परिस्थिती राहिली, तर सुक्या मेव्याचे भाव गगनाला भिडू शकतात, असा व्यापाऱ्यांचा दावा आहे.अफगाणिस्तान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इराण आणि दक्षिण आफ्रिका यासह अनेक देशांमधून खारी बाओलीला सुकामेवा पुरवला जातो.

एका व्यावसायिकाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानातून येणारा सुक्या मेव्याचा पुरवठा थांबला आहे. त्यामुळे बाजारात खळबळ माजली आहे. आंतरराष्ट्रीय फळं आणि काजू संघटनेचे संचालक रवींद्र मेहता म्हणाले की, पहलगाममधील घटना अत्यंत दुःखद आहे.सीमा बंद झाल्याने अफगाणिस्तानसोबतचा व्यापार ठप्प झाला आहे. अफगाणिस्तानातील सुमारे ९० टक्के माल भारतात येतो. यामध्ये अंजीर, हिंग, पिस्ता, मनुका, जिरं, मनुका यांचा समावेश आहे. चार दिवसांपासून पुरवठा बंद झाला आहे.या बंदमुळे घाऊक बाजारात अंजीरच्या किमतीत प्रति किलो २०० रुपये, पिस्त्यात ४०० ते ५०० रुपये, मनुका १०० रुपये आणि सुक्या द्राक्षांच्या किमतीत १०० रुपये प्रति किलो वाढ झाली आहे. पुढील एक महिना हीच परिस्थिती राहिली तर सुक्या मेव्याच्या किमतीत लक्षणीय वाढ होऊ शकते.

सध्या देशात सुक्या मेव्याचा पुरवठा अमेरिका, ऑस्ट्रेलिया, तुर्की येथून होत आहे आणि काही वस्तू इराणमधूनही येत आहेत. परंतु अफगाणिस्तानातून सुक्या मेव्यांचा पुरवठा थांबल्यामुळे इतर देशांमधून येणाऱ्या काजू, बदाम, अक्रोडाचा वापर वाढेल, ज्यामुळे त्यांच्या किमतीही वाढू शकतात. मिठाईसाठी पिस्ता मिळणं देखील कठीण होईल. ज्यामुळे त्याचा थेट परिणाम मिठाईच्या किमतीवर होईल.दरवर्षी अफगाणिस्तानातून सुमारे १.२५ लाख टन सुकामेवा भारताला पुरवला जातो. यासाठी येथील व्यावसायिक आगाऊ पैसे देतात. अफगाणिस्तानातून सुक्या मेव्यांचा पुरवठा थांबल्यामुळे कोट्यवधी रुपये अडकले आहेत, असं एका व्यावसायिकाने सांगितलं.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.