आधी नितेश राणेंची जहरी टीका, नंतर योगेश कदमांकडून तिखट समाचार; दोन कोकणकर मंत्र्यांत वाकयुद्ध.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या हिंदू जनजागृती सभेत नितेश राणे यांनी अप्रत्यक्षरित्या योगेश कदमांवर टीका केली आहे. यावर योगेश कदमांनी सुनावलं आहे.कोकणात दापोली तालुक्यात दोन दिवसांपूर्वी मंत्री नितेश राणे यांनी दापोली तालुक्यात हिंदू जनजागृती सभेत दापोली तालुक्यात अडखळ येथील झालेल्या वादावर भाष्य करताना नाव न घेता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर निशाणा साधला होता. ‘ज्यांनी आमच्या मुलांना दगड मारले त्यांना कोण वाचवतो आहे,

हा सगळा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाईल, तेव्हा यांचे फोन बंद होतील. यांच्या खुर्च्या जातील,’ अशी जहरी टीका नितेश राणे यांनी अप्रत्यक्षरित्या केली होती. या वक्तव्यावर शिंदे यांच्या शिवसेनेचे युवा नेते तथा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नितेश राणे यांना सुनावलं आहे. ‘माझ्या मतदारसंघात येऊन त्यांनी मला शिकवण्याची गरज नाही.’ अशा शब्दांत योगेश कदम यांनी समाचार घेतला आहे.कदम पुढे म्हणाले की, ‘नितेश राणे माझे मित्र आहेत. दापोली तालुक्यात अडखळ येथील झालेल्या घटनेत १४ जणांवर एफआयआर दाखल झाला आहे.

पण माझ्या मतदारसंघातून येऊन त्यांनी मला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही, आम्ही लहानपणापासून शिवसेनेचे बाळकडू आम्हाला रामदास कदम यांनी पाजलं आहे. आम्ही जन्मापासूनचे शिवसैनिक आहोत. आम्ही आमच्या हातातला भगवा कधी खाली ठेवला नाही.”नितेश राणे यांना काही स्थानिक लोकांनी चुकीची ब्रीफिंग केली असेल. त्यांना काही लोकांनी चुकीची माहिती दिली असावी, त्यांनी जर का मला एक फोन करून विचारलं असतं मला संपर्क केला असता तर मलाही बरं वाटलं असतं,’ असेही योगेश कदम म्हणाले. ‘त्यांनी माझ्या मतदारसंघात येताना मला कळवलंही नाही,’ अशा शब्दांत योगेश कदम यांनी नाराजीही व्यक्त केली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.