पुणे रेल्वे स्थानकाबाबत महत्त्वाची माहिती, प्रवाशांच्या सोयीसाठी खास सुविधा; अट फक्त एकच…

पुणे रेल्वे स्थानकावर उन्हाळी सुट्टीमुळे प्रवाशांची गर्दी वाढली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी फलाट क्रमांक एकजवळ ‘होल्डिंग झोन’ बनवला आहे. येथे प्रवाशांना बसण्याची आणि पाण्याची सोय आहे. केवळ ‘कन्फर्म’ तिकीट असलेल्यांनाच फलाटावर प्रवेश मिळेल. रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढवण्यात आली असून सुरक्षेसाठी आरपीएफचे जवान तैनात केले आहेत.उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू झाल्यामुळे रेल्वेस्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे. त्यामुळे चेंगराचेंगरीसारख्या घटना घडू नयेत आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे स्थानकावरील फलाट क्रमांक एकच्या शेजारील व्हीआयपी गेटच्या शेजारी ‘होल्डिंग झोन’ तयार करण्यात आला आहे. त्यामुळे उन्हात उभे राहणाऱ्या प्रवाशांची सोय झाली आहे.पुणे रेल्वे विभागाकडून प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पुणे रेल्वे स्थानकावर नेहमीच गर्दी असते; पण आता सुट्टीच्या हंगामात आणखी गर्दी वाढते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने होल्डिंग झोन तयार केला आहे.

या ठिकाणी प्रवाशांना थांबण्यासाठी शेड केले आहे. पुणे स्थानकावर एसटी बसस्थानकाच्या मागील बाजूस, व्हीआयपी रूमच्या शेजारी मंडप टाकण्यात आले आहेत. या ठिकाणी प्रवाशांसाठी पाण्याची, बसण्याची सोय करण्यात आले आहे. यामुळे जवळपास एक हजार प्रवाशांना बसण्याची सोय होणार आहे. ज्या प्रवाशांचे तिकीट ‘कन्फर्म’ आहे, त्यांनाच रेल्वेस्थानकातील फलाटवर प्रवेश मिळणार आहे. इतर प्रवाशांना होल्डिंग झोनमध्ये थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.होल्डिंग झोनमध्ये प्रवाशांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. गर्दी व्यवस्थापनासाठी २५ ‘आरपीएफ’ कर्मचारी आणि १५ तिकीट तपासणी कर्मचारी पुणे रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आले आहेत.पुणे रेल्वे विभागात प्रवाशांची वाढती गर्दी पाहता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे सुरक्षा दलाकडून कडक उपाययोजना राबविणे सुरू झाले आहे.

रेल्वेगाड्यांमध्ये आणि पुणे रेल्वे स्थानकावरील सुरक्षा वाढवली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना दक्ष राहून तपासणीचा आदेश दिला आहे. पहलगाम येथील हल्ल्यानंतर पुणे रेल्वे विभाग, लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत पुणे रेल्वे स्थानकावरील सुरक्षा वाढवण्यावर चर्चा झाली.याबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की पुणे रेल्वे विभागाने प्रवासी व रेल्वे मालमत्तेच्या सुरक्षेसाठी सुरक्षा उपाययोजना बळकट केल्या आहेत. अतिरिक्त निरीक्षकाची नियुक्ती केली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नियमित अनपेक्षित तपासणी केली जाते. लोहमार्ग पोलिसांसोबत समन्वय बैठकांचे आयोजन केले जात आहे. ‘डॉग स्क्वॉड’च्या मदतीने तपासणी केली जात आहे. त्वरित माहिती प्रसारणासाठी आपत्कालीन व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आहे. सूचना मिळताच एकत्र येण्यास तयार राहण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.