फसवणूक प्रकरणी एलसीबीने ठोकल्या मनोज वाणीला बेड्या !

जुन्या घराची सौदा पावती करून एक कोटी १५ लाख रुपये घेऊनही मिळकतीची खरेदी करून देण्यास टाळाटाळ करून बांधकाम व्यावसायिक सुनील मधुकर चौधरी (वय ५२, रा. धरणगाव) यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. यातील संशयित मनोज लिलाधर वाणी (रा. जिल्हा परिषद कॉलनी) यांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने दि. २८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव येथील सुनील चौधरी यांचा बांधकाम तसेच जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. जळगाव महापालिका हद्दीतील जुन्या बांधीव घराचा व्यवहार ठरवून सौदा पावती करण्यात आली. त्यासाठी चौधरी यांच्याकडून समोरील व्यक्तींनी एक कोटी १५ लाख रुपये घेण्यात येऊन करारनामा करण्यात आला. त्यानंतर मात्र सदर मिळकतीची खरेदी करून देण्यास टाळाटाळ केली जाऊ लागली.

पाठपुरावा करून खरेदी होत तर नव्हतीच शिवाय रक्कमही परत मिळत नसल्याने आर्थिक फसवणूक झाली म्हणून सुनील चौधरी यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मनोज लीलाधर वाणी, कल्पना मनोज वाणी, शैलेंद्र हेमचंद्र भिरुड, हेमलता उर्फ तनुजा शैलेंद्र भिरुड, तिलोत्तमा दीपक इंगळे, दीपक पीतांबर इंगळे, संदीप हरिभाऊ पाटील, राजेंद्र गोपाळ सावदेकर, शेखर भास्कर भिरुड, शिरीष भास्कर भिरुड, नरेंद्रकुमार दत्तात्रय भिरुड, ज्ञानेश्वर दत्तात्रय भिरुड, गौरव कृष्णा भिरुड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.