अमळनेरचा डॉन आहे म्हणत गळ्याला चाकू लावून ट्रकचालकाला लुटले !

अमळनेर तालुक्यातील नरडाणा येथे अमळनेर मार्गे जातांना गलवाडे रस्त्यावर तीन जण मोटरसायकलवर येवून रस्त्यात ट्रक अडवून ट्रक ड्रायव्हरच्या गळ्याला चाकू लावून त्याच्याकडून १ हजार रुपये हिसकावले आणि मालकाकडून एक लाख रुपये मागितल्याची घटना दि.२७रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास गलवाडे रस्त्यावर घडली.सविस्तर वृत्त असे कि, अनिल अश्रूबा विलग रा. कोनोसी ता. शिवगाव जि. अहिल्यानगर हा अहिल्यानगर येथील स्वप्नील झिने यांचा हायवा ट्रक क्रमांक एम.एच. १६, सी.ई.४७९७ मध्ये भुसावळ येथून फ्लॅश पावडर घेऊन नरडाणा येथे अमळनेर मार्गे जातांना गलवाडे रस्त्यावर तीन जण मोटरसायकलवर आले आणि त्यांनी मोटरसायकल पुढे लावून ट्रक अडवला.

एक जण केबिनमध्ये चढून म्हणाला की, मी कैलास नवघरे आहे, अमळनेरचा डॉन आहे. ट्रक ड्रायव्हरच्या गळ्याला चाकू लावून आताच्या आता एक लाख रुपये दे म्हणत खिश्यात हात घातला आणि एक हजार रुपये काढून घेतले. दुसऱ्यानेही त्याचे नाव मोझम शेख असे सांगितले. नंतर त्यांनी मालकाला फोन लावून एक लाख मागव नाहीतर तुझा खून करून टाकू, आम्ही पाच खून केले असल्याचे सांगितले. ड्रायव्हरने मालकाला फोन लावला व पैश्यांची मागणी करून खून करण्याची धमकी दिली. नंतर ट्रक एका बाजूला कॉलनीत नेला.परंतु मालकाने अमळनेर पोलिसांना फोन लावल्याने पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, राजेंद्र कोठवदे, संतोष पवार, मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, सुनील पाटील, योगेश बागुल, संजय सोनवणे हे घटनास्थळी धाव घेवून कैलास नवघरे यास अटक केली.

मात्र, याप्रसंगी मोझम शेख व तिसरा अनोळखी आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. तिघाविरुद्ध रस्ता अडवून जबरी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत. दरम्यान, कैलास नवघरे हा खून प्रकरणात सुरत येथे शिक्षा भोगत असून तो पॅरोलवर बाहेर आला होता. दि २७ रोजीच तो परत जाणार होता. तत्पूर्वी ट्रक चालकाला धमकवण्याच्या प्रकरणात तो पोलिसांच्या तावडीत अडकला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.