शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊच! महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्ट संकेत, म्हणाले…

येत्या पाच वर्षांत या सोयी उपलब्ध करून देऊ. यासोबतच शेतकऱ्यांना कर्जमाफीही देऊ, असे स्पष्ट संकेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.आजनसरा येथे भोजाजी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यादरम्यान बावनकुळे यांनी भाविकांशी संवाद साधला. यावेळी आमदार समीर कुणावार, माजी खासदार रामदास तडस, माजी खासदार सुरेश वाघमारे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट आदी उपस्थित होते.शेतकऱ्यांच्या शेतावर जाण्यासाठी रस्ता आणि विजेची सोय आवश्यक आहे. येत्या पाच वर्षांत या सोयी उपलब्ध करून देऊ. यासोबतच शेतकऱ्यांना कर्जमाफीही देऊ, असे स्पष्ट संकेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.बावनकुळे म्हणाले, आम्ही वचननाम्यावर काम करीत आहोत. दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्याचे काम करीत आहोत. पहलगाममध्ये काय झाले हे सर्वांनी पाहिले. धर्म विचारून मुलासमोर, पत्नीसमोर गोळ्या घालण्यात आल्या.

फार विचित्र प्रकार घडतो आहे. निर्दयपणे दहशतवादी हल्ला झाला आहे. या अधर्मी कार्यावर विजय मिळविण्यासाठी आपल्या येणाऱ्या पिढ्या धार्मिक आणि संस्कारी व्हाव्या यासाठी अध्यात्माची गरज आहे. संत भोजाजी महाराजांच्या आशीर्वादाने येणाऱ्या पिढ्या संस्कारित व्हाव्या यासाठी हा भक्तिभाव आहे. महाराजांचे आजनसरा हे तीर्थक्षेत्र लवकरच ब वर्ग तीर्थक्षेत्र होऊन राज्यात लोकप्रिय होईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. पर्यटनमंत्री व ग्रामविकास मंत्री यांच्यासह चर्चा करून लवकरच यावर निर्णय घेऊ, असे आश्वासनही बावनकुळे यांनी दिले आहे.

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज, शनिवारी अमरावती दौऱ्यावर जाणार आहेत. अमरावती येथे धनगर समाजातर्फे डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांचा सत्कार आणि धनगर समाजाचा मेळाव्याला उपस्थित राहतील.‘आजनसराचा विकास सरकारची जबाबदारी’दीड लाखावर लोक महिन्याला यास्थळी येतात. त्यामुळे आजनसराचा विकास ही सरकारची जबाबदारी आहे. रस्ते, वीज, पाणी यासारख्या भाविकांसाठी सुविधा ही सरकारची जबाबदारी असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.