वेळ आलीयं एकत्र येण्याची… शिवसैनिक तयार आहे…, ठाकरे गटाची पोस्ट अन् राज ठाकरेंना साद.

राज ठाकरेंच्या सादेला उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिल्यानंतर मनसे आणि शिवसेना एकत्र येण्याची जोरदार चर्चा राज्यभर सुरू झाली. ठाकरे गटाने एक पोस्ट करत पुन्हा एकत्र येण्याच्या विषयाला हात घातला आहे. शिवसेना ठाकरे गटाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.महाराष्ट्राच्या राजकारण बदलवून टाकणारी एक मोठी युती भविष्यात होऊ शकते. या युतीचे संकेत दोन्ही ठाकरे बंधुंनीच काही दिवसांपूर्वी दिले होते. राज ठाकरे यांनी अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्यासोबतची भांडण फार किरकोळ आहेत महाराष्ट्र मोठा आहे असे विधान केले आणि त्याला तात्काळ प्रतिसाद देत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी किरकोळ वाद बाजूला ठेवण्यास मी असल्याचे सांगितले. त्यानंतर मनसे आणि शिवसेना एकत्र येण्याची जोरदार चर्चा राज्यभर सुरू झाली.

सध्या दोन्हीही ठाकरे बंधु सध्या परदेशात असल्याने या चर्चेला नेमके कधी मूर्त स्वरुप प्राप्त होईल हे कळू शकले नाही आहे.मनसे शिवसेना युती होते की ही केवळ चर्चा राहते हे लवकरच कळेल. दरम्यान ठाकरे गटाने एक पोस्ट करत पुन्हा एकत्र येण्याच्या विषयाला हात घातला आहे. शिवसेना ठाकरे गटाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये मुंबई महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याची वेळ आली आहे. अशा स्वरुपाचा आशय लिहिला आहे.वेळ आलीयं, एकत्र येण्याची मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे,मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी!या पोस्टद्वारे शिवसेना ठाकरे गटाने राज ठाकरे यांना पुन्हा साद घातली असल्याची चर्चा आहे.या पोस्टवर कमेंटचा पाऊस पडला असून लवकर एकत्र या, एकत्र या लवकर मग कशी मज्जा येते विरोधकांची ते बघायला संपूर्ण महाराष्ट्र आतुर आहे.

प्रत्येक मराठी माणूस या क्षणाची आतुरतेने वाट बघतोय. एकदा घोषणा झाली की मग वादळ आणि फक्त वादळ.राजउद्धव. अशा कमेंटस युजर्सनी केला आहेत.राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास म्हणजेच मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने युती केल्यास त्याचा मोठा फायदा दोन्ही पक्षांना होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्याला नवा पर्याय मिळेल. येत्या काही महिन्यात मुंबई आणि राज्यातील महत्त्वाच्या शहरातील महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांना फायदा होईल. मुंबई मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांकडून आक्रमक प्रचार करुन महापालिकेत सत्ता स्थापन करता येऊ शकते. जर एकत्र राहिल्यास दीर्घकालिन अनेक फायदे होऊ शकतात.मात्र यासाठी दोन्ही पक्षांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.