दहशतवाद्यांना भिडलेल्या आदिलचा भाऊही धडाकेबाज! नजाकतने चिमुरड्यांसह भाजप नेत्याच्या कुटुंबाला वाचवलं.

 ‘​​पर्यटकांची सुरक्षा माझ्यासाठी महत्त्वाची होती. या परिसराला असलेल्या कुंपणातील एका लहानशा उघड्या जागेतून मी दोन लहान मुलांना घेऊन बाहेर पडलो आणि पहलगामकडे धाव घेतली,’ असे नजाकतने सांगितलेपहलगामच्या दहशतवादी हल्ल्यावेळी स्थानिक काश्मिरींनी आपल्या जीवाची बाजी लावून पर्यटकांना वाचवल्याच्या घटना समोर येत आहेत. नजाकत अहमद शाह या गाइडने स्वत:चा जीव धोक्यात घालून, छत्तीसगडमधील पर्यटकांचा जीव वाचवला. छत्तीसगडमधील भाजपचे पदाधिकारी अरविंद अग्रवाल यांनी सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर केला असून, त्याला हजारो ‘लाइक्स’ मिळाले आहेत.छत्तीसगडच्या मनेंद्रगड- चिरमिरी-भरतपूरमधील भारतीय जनता युवा मोर्चाचे सदस्य अरविंद अग्रवाल आणि त्यांच्यासोबतचे कुलदीप स्थापक, शिवांश जैन आणि हॅपी वाधवान यांची कुटुंबे अशा 11 पर्यटकांच्या गटासाठी नजाकत (28) हा गाइड होता. नजाकत हा चिरमिरीमध्ये शालींच्या विक्रीसाठी जात असल्याने या कुटुंबांशी त्याची ओळख होती.

‘17 एप्रिलपासून मी दोन गाड्यांमधून या सर्वांना श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्गला फिरवले. माझे गाव पहलगामजवळ असल्याने त्यांचे आदरातिथ्य करण्यासाठी शेवटी पहलगामला जायचे ठरवले. बैसरनला फिरत असतानाच, दुपारी दोनच्या सुमारास गोळीबाराचा आवाज आला. लोक सैरावैरा पळू लागले’ असे नजाकतने सांगितले.‘पर्यटकांची सुरक्षा माझ्यासाठी महत्त्वाची होती. या परिसराला असलेल्या कुंपणातील एका लहानशा उघड्या जागेतून मी दोन लहान मुलांना घेऊन बाहेर पडलो आणि पहलगामकडे धाव घेतली,’ असे नजाकतने सांगितले. मुलांना सुरक्षित जागी ठेवून, परत घटनास्थळी येऊन त्याने इतरांनाही पोहोचवले.अग्रवाल यांनी आपल्या कुटुंबीयांचे नजाकतसोबतचे फोटो ‘फेसबुक’वर पोस्ट करून ‘तू स्वतःचा जीव धोक्यात घालून आमचे प्राण वाचवलेस. तुझे ऋण आम्ही कधीच फेडू शकणार नाही,’ असे लिहिले आहे. तर ‘गोंधळ, गोळीबार, किंकाळ्या आणि मृत्यूची छाया सभोवती असताना हे करणे हे सामान्य माणसाचे काम नाही.

लोक जाति-धर्मावर वाद घालतील; पण मानवतेचे सुंदर उदाहरण घालून देणाऱ्या नजाकतभाईची काळजी कोण घेईल,’ या शब्दांत कुलदीप स्थापक आणि अरविंद अग्रवाल यांनी सोशल मीडियावर नजाकतसोबतची छायाचित्रे शेअर केली. नजाकतने मुलांना खांद्यावर घेऊन 14 किमी अंतर धावून सुरक्षितस्थळी पोहोचवल्याचेही त्यांनी लिहिले. स्थापक यांची पत्नी चिरमिरी शहरात भाजपची नगरसेवक आहे.पहलगामच्या हल्ल्यात मृत्यू झालेला स्थानिक खेचरवाला सईद आदिल हुसेन हा नजाकतचा मामेभाऊ होता. पर्यटकांना सुरक्षित सोडण्याला प्राधान्य देऊन नजाकत आदिलच्या अंत्यसंस्काराला अनुपस्थित राहिलाजम्मू आणि काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी विशेष अनारक्षित ट्रेन सोडण्यात आल्या. गुरुवारी रात्री एका ट्रेनने 580 आरक्षित आणि 180 अनारक्षित, तर कटरा स्थानकातून निघालेल्या दुसऱ्या ट्रेनने 200 प्रवासी परतले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.