फोटो काढले, पहलगामहून निघालो अन्… वाघमारे कुटुंबाचा अंगावर काटा आणणारा अनुभव.

सहल आटोपून 22 एप्रिलला परत येण्याचेही नियोजन होते. मात्र काही तासांपूर्वी ज्या ठिकाणी आम्ही सहलीचा मनसोक्त आनंद घेतला आणि हे आनंदाचे क्षण कॅमेरात कैद केले त्याच ठिकाणी दहशतवादी हल्ला झालापहलगाम (काश्मीर) येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराची माहिती मिळताच आम्हाला मोठा धक्का बसला. हल्ला झाला तेव्हा काही तासांपूर्वी आम्ही तिथेच होतो. काश्मीरच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेत होतो. आम्ही सर्व सात जण सुखरूप आहोत. आम्ही आता नागपूरला येण्यासाठी निघालो आहे, असे नागपुरातून काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या पृथ्वीराज वाघमारे यांनी सांगितले. नागपुरातील इतर लोकांनीही आता परतीचा मार्ग धरला आहे.काटोलचे तिघे आणि कोराडी येथील चौघे असे सात जण आम्ही काश्मीर सहलीला निघालो होतो. सहल छानच सुरू होती. धम्माल मस्ती केली.

खरच काश्मीर नंदनवन आहे, याची प्रचिती तिथे आम्हाला आली. सहल आटोपून 22 एप्रिलला परत येण्याचेही नियोजन होते. मात्र काही तासांपूर्वी ज्या ठिकाणी आम्ही सहलीचा मनसोक्त आनंद घेतला आणि हे आनंदाचे क्षण कॅमेरात कैद केले त्याच ठिकाणी दहशतवादी हल्ला होतो, ही माहिती कानावर पडताच मोठा धक्का बसला.दैव बलवत्तर होते म्हणून आम्ही वाचलो, ही भावना मनात आली. मात्र आपल्यासारख्याच इतर पर्यटक मित्रांना जीव गमवावा लागला याचे मोठे दु:ख आहे. दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला नागपुरात येण्यासाठी साधन नव्हते. आमचा मुक्काम आणखी दोन दिवस वाढवावा लागला. सहा ते सात हजारांची तिकीट आम्हाला २० हजार रुपयांत काढावी लागली, असे या पर्यटकांनी सांगितले.

पारशिवनी तालुक्यातील आम्ही 26 जण काश्मीरला गेलो होतो. आयुष्यातील बकेट लिस्ट म्हणून आमचा काश्मीरचा प्रवास होता. सहा दिवसांचे नियोजन होते, मात्र दहशतवादी हल्ल्यामुळे चार दिवसांतच आम्हाला आमची सहल आटोपावी लागली. सैन्याच्या सुरक्षेत आम्ही बाहेर पडलो. हल्ला झाला तेव्हा आम्ही गुलमर्गला होतो. अंतर दूर असले तरी त्याची दाहकता आम्हाला सोसावी लागली. असे पंकज भोवते यांनी सांगितले. समता नगर येथील मोहन जुमळे यांचा 26 जणांचा मित्र परिवारही काश्मीरला गेला होता. विदर्भाच्या वेगवेगळ्या भागातून सहलीसाठी एकत्र आलेल्या मित्रांनाही चार दिवसांत आपली सहल थांबवावी लागली. हल्ला झाला तेथून आम्ही 25 किलोमीटर अंतरावर होतो, असे मोहन जुमळे यांनी सांगितले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.