पडवीमध्ये झोपलेल्या आजीबाईंचा बाजूच्या शेतात सापडला मृतदेह, नेमकं काय घडलं? पुण्यातील धक्कादायक घटना.

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून, इनामगाव येथे एका वृद्ध महिलेवर हल्ला करून तिला ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यापूर्वी मांडवगण फराटा आणि पिंपळगाव सुटी येथेही बिबट्याने लहान मुलांचा बळी घेतला होता. वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वनविभागाने परिसरात पिंजरे लावण्याची मागणी जोर धरत आहे.पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मानवी वस्तीत बिबट्यांचा मुक्त वावर वाढल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आज पहाटेच्या सुमारास इनामगाव (ता. शिरूर) येथे एका वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला करून तिला उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला असून, तिचा मृतदेह घरापासून काही अंतरावरील शेतात आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध महिला घराच्या पडवीत झोपली असताना पहाटे बिबट्याने अचानक हल्ला केला. बिबट्याने तिला उचलून शेतात नेले, जिथे तिचा मृतदेह आढळला. ही घटना समजताच गावकऱ्यांनी वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा शोध घेतला आणि तो ताब्यात घेतला. मृतदेह पंचनाम्यासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.शिरूर तालुक्यात यापूर्वीही बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत. मांडवगण फराटा येथे दोन लहान मुलांचा, तर पिंपळगाव सुटी येथे एका लहान मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. आता इनामगाव येथील या घटनेने स्थानिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

बिबट्यांचा मानवी वस्तीतील वावर रोखण्यासाठी वनविभागाकडून ठोस उपाययोजनांची मागणी होत आहे. वनविभागाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, परिसरात पिंजरे लावणे आणि गस्त वाढवण्याचे नियोजन केले आहे. तसेच, स्थानिकांना रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरीही, वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.दरम्यान, वनविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्हा उपस्थित होत आहे. कारण शिरूरमधील अनेक भागात बिबट्या घुसल्याच्या अनेक घटना कानावर येताता. अनेकवेळा लोकांवर हल्ला होतो तर काहीवेळा घराबाहेरील पाळीव प्राण्यांवर हे बिबटे हल्ला करून घेऊन जातात. पडवीत झोपलेल्या आजीलाच नेल्याने परिसरात दहशतीचं वातावरण पसरले आहे. वनविभागाने परिसरात पिंजरे लावण्याची मागणी जोर धरत आहे. याकडे वनविभगाने लक्ष दिले पाहिजे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.