मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! एल्फिन्स्टन पूल उद्यापासून वाहतुकीसाठी बंद; असे आहेत पर्यायी मार्ग

या पुलावरील वाहतूक उद्या, शुक्रवारी रात्री नऊ वाजल्यापासून बंद करण्यात येणार असल्याचे मुंबई वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे.मध्य मुंबईतील पूर्व-पश्चिमेला जोडणारा आणि कायम वाहनांची वर्दळ असलेल्या महत्त्वाच्या एल्फिन्स्टन पुलावरील वाहतूक बंद करण्याचा दिवस अखेर ठरला आहे. वांद्रे- वरळी सागरी सेतूला थेट अटल सेतूशी शिवडी येथे जोडण्यात येणार असून, त्यासाठी हा पूल पाडून ‘एमएमआरडीए’च्या वतीने नवीन पूल बांधण्यात येणार आहे.यासाठी या पुलावरील वाहतूक उद्या, शुक्रवारी रात्री नऊ वाजल्यापासून बंद करण्यात येणार असल्याचे मुंबई वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी ८ एप्रिलला अधिसूचना काढून वाहतुकीसाठी एल्फिन्स्टन पूल बंद करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलिसांचे मध्य मुंबईत वाहतुकीचे नियमन केले. याबाबत नागरिकांच्या काही हरकती असल्यास पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते.नागरिकांच्या आलेल्या हरकती आणि त्यानुसार वाहतुकीच्या नियमनात केलेले अंशतः बदल जाहीर करीत २५ एप्रिलला रात्री नऊ वाजल्यापासून वाहतूक बंद होणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.दादर पूर्वेकडून पश्चिमकडे व दादर मार्केटकडे जाणारे वाहनचालक हे टिळक पुलाचा वापर करतील.परळ पूर्वेकडून प्रभादेवी व लोअर परळ जाणारे वाहनचालक हे करी रोड पुलाचा वापर करतील (सकाळी ७ वा. ते दुपारी ३ वा. पर्यंत).परळ, भायखळा पूर्वेकडून प्रभादेवी, वरळी, कोस्टल रोड व सि-लिंकच्या दिशेने जाणारे वाहनचालक हे चिंचपोकळी पुलाचा वापर करतील.

सकाळी ७ वा. ते दुपारी ३ वाजेपर्यंत कॉम्रेड कृष्णा देसाई चौक (भारत माता जंक्शन) कडून शिंगटे मास्तर चौककडे वाहतूक एक दिशा चालू राहील.दुपारी ३ ते रात्री ११ पर्यंत शिंगटे मास्तर चौकाकडून कॉम्रेड कृष्णा देसाई चौकाकडे (भारत माता जंक्शन) वाहतूक एक दिशा चालू राहील.रात्री ११ ते सकाळी ७ वा. या कालावधीत दोन्ही मार्गिका चालू राहतील.दादर पश्चिमेकडून दादर पूर्वकडे जाणारे वाहनचालक हे टिळक पुलाचा वापर करतील.प्रभादेवी व लोअर परळ पश्चिमेकडून परळला, टाटा रुग्णालय व के. ई. एम. रुग्णालय येथे जाणारे वाहनचालक हे करी रोड पुलाचा वापर करतील. (दुपारी ३ वा. ते रात्रौ ११ वा. पर्यंत).कोस्टल रोड व सी-लिंकने व प्रभादेवी, वरळीकडून परळ, भायखळा पूर्वेकडे जाणारे वाहनचालक हे चिंचपोकळी पुलाचा वापर करतील

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.