पहलगाम हल्ल्याबाबत आतापर्यंतच्या सर्वात मोठा खुलासा, दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान…

पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून मोठी कारवाई सुरू आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य करत हल्ला केला, ज्यात अनेक जण मारले गेले. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी एप्रिल महिन्यात रेकी केली होती आणि ते लष्कराच्या गणवेशात आले होते. सुरक्षा दलांनी शोध मोहीम तीव्र केली असून, अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठी कारवाई सध्या सुरू आहे. दहशतवाद्यांकडून पर्यटकांना टार्गेट करत हल्ला करण्यात आला. देशातील अनेक भागातील पर्यटकांचा या हल्ल्यात जीव गेला. धर्म विचारून दहशतवाद्यांनी लोकांना टार्गेट केले. गेल्या काही महिन्यांपासून या हल्ल्याचा कट रचला जात असल्याची हैराण करणारी माहिती पुढे येताना दिसतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यात १५०० हून अधिक लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

या लोकांना वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आणि संवेदनशील भागातून पकडण्यात आले आहे.पहलगामच्या हल्ल्यात दोन स्थानिकांचा देखील समावेश असल्याने मोठी खळबळ उडालीये. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याबद्दल एक अत्यंत मोठी आणि हैराण करणारी अपडेट पुढे येताना दिसतंय. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी अगोदर रेकी करून हा दहशतवादी हल्ला घडवून आणलाय. या भागात १ ते ७ एप्रिल दरम्यान हल्लेखोरांनी संपूर्ण रेकी केली होती.घटनास्थळापासून काही अंतरावर सुरक्षा दलांना नंबर प्लेट नसलेली मोटारसायकल सापडली होती, जी कालच जप्त करण्यात आली.

गुप्तचर सूत्रांकडून पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. हे दहशतवादी लष्कराच्या गणवेशात दाखल झाले होते. हिंदू असल्याचे स्पष्ट होताच दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले. यादरम्यान त्यांनी महिला आणि लहान मुलांना टार्गेट केले नसल्याचेही स्पष्ट झाले.जम्मू-काश्मीर पोलिस, लष्कर आणि सीआरपीएफने दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आणि पहलगाम आणि आसपासच्या भागात संपूर्ण नाकेबंदी केली. सर्व महत्त्वाच्या मार्गांवर वाहनांची तपासणी केली जात आहे. हेलिकॉप्टरद्वारे दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. काही ठिकाणी दहशतवाद्यांसोबत चकमक झाल्याचीही माहिती मिळत आहे. सरकारकडून या हल्ल्यानंतर कडक पाऊले उचलली जात आहेत. दिल्लीमध्ये एक बैठक पार पडली आणि काही मोठे निर्णय घेण्यात आली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.