रत्नागिरीचे सर्व काश्मीर पर्यटक सुरक्षित असून २८ एप्रिलला घरी परतत आहेत.

 रत्नागिरीत जिल्ह्यातील सर्व पर्यटकांशी संपर्क झाला असून, ते सुरक्षित आहेत. जिल्हा प्रशासन सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे’, अशी माहिती माहिती बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आली. ‘काश्मीमधील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या रत्नागिरीत जिल्ह्यातील सर्व पर्यटकांशी संपर्क झाला असून, ते सुरक्षित आहेत. जिल्हा प्रशासन सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे’, अशी माहिती माहिती बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.‘हातखंबा येथील श्री टुरिझमद्वारे ३४, तर अमृता ट्रॅव्हल्समार्फत सहा जण पर्यटनासाठी गेले होते. संध्याकाळी उशिरापर्यंत नियंत्रण कक्षाकडून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू होता. हे सर्वजण सुखरूप आहेत’, असे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सांगितले.दरम्यान, रत्नागिरी येथील शासकीय महाविद्यालयातील डॉ. कुणाल देसाई यांच्या नेतृत्वाखाली २० जणांचे पथक काश्मीरला गेले आहे.

याबाबत माहिती मिळताच पालकमंत्री उदय सामंत यांनी संपर्क साधून त्यांची चौकशी केली. हे सर्वजण श्रीनगर येथे सुखरूप असून, २८ एप्रिल रोजी रत्नागिरीत परतणार आहेत.पहलगाममध्ये हल्ल्यानंतर विदर्भातील ३२३ पर्यटक जम्मू-काश्मिरमध्ये अडकले आहेत . यात नागपुरातील १९४, बुलढाण्यातील ५०, अमरावतीचे ३६, अकोल्यातील ३०, चंद्रपुरातील सात आणि गोंदियातील सहा पर्यटकांचा समावेश आहे . ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पर्यटकांना परत आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हजारो पर्यटक जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे-पाटील यासुद्धा कुटुंबीयांसोबत अडकल्या. ‘अवघ्या २४ तास आधी आम्ही पहलगामला जाऊन तिथले निसर्गसौंदर्य अनुभवले, त्या ठिकाणीपर्यटकांवर हल्ला झाल्याचे ऐकून आम्ही हादरलो आहोत,’ अशी भावना त्यांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना व्यक्त केली. ठोंबरे बुधवारी रात्री कुटुंबीयांसोबत दिल्ली येथे परतल्या. ठोंबरे कुटुंबीय आणि मित्रपरिवार असे १२ जण १८ एप्रिलला जम्मू आणि काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते. सोमवारी दुपारीच त्या पहलगाम येथेही कुटुंबासोबत गेल्या होत्या. त्यावेळचे फोटो आणि व्हिडीओही त्यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट केले होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.