पहलगामचा बदला भारत बालाकोटपेक्षाही भयंकर घेईन, घाबरुन पाकिस्तान अलर्ट मोडवर, सैनिकांबाबत मोठा निर्णय.

 पहलगाम हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारताकडून एअर स्ट्राईक होण्याची शक्यता असल्याने पाकिस्तान सतर्क झाला आहे. भारताने कडक पाऊले उचलल्यामुळे पाकिस्तानने तातडीने बैठकीचे आयोजन केले असून संभाव्य कारवाईला उत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे.पहलगामवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानने मोठा धसका घेतलाय. भारताकडून पुन्हा एयरस्ट्राइक केली जाऊ शकते, असे पाकिस्तानला वाटतंय. पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. हे दहशतवादी पाकिस्तानमधून आल्याचे स्पष्ट झालंय. काल दिल्लीमध्ये एक महत्वपूर्ण बैठक झाली आणि पाकिस्तानविरोधात कडक पाऊले उचलली गेली. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तामध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले. हेच नाही तर भारताने केलेल्या कारवाईला सडेतोड उत्तर देणार असल्याचे पाकिस्तानकडून स्पष्ट करण्यात आले.पाकिस्तान जरी म्हणत असेल की, सडेतोड उत्तर देऊ परंतू दुसरीकडे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे.

यावेळी बालाकोटपेक्षाही धोकादायक कारवाई होईल असे म्हटले जात आहे. २०१९ मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला आणि मोठे नुकसान केले. पहलगामवरील हल्ल्याचा बदल घेण्यासाठी भारत यावेळीही असे काही करेल यामुळे पाकिस्तान चिंताग्रस्त आहे. हेच नाही तर याच पार्श्वभूमीवर त्यांनी सैनिकांच्या सुट्ट्या देखील रद्द केल्या आहेत.दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारने पाकिस्तानविरुद्ध कारवाई करून अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. मात्र, एयरस्ट्राइक किंवा हल्ला करून पाकिस्तानल धडा शिकवण्याची मागणी केली जात आहे. सिंधू पाणी करार स्थगित करून अटारी चेकपोस्ट बंद करण्याची घोषणाही केली.

पाकिस्तानवर मोठा दबाव दिसत आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफने देखील भारताकडून होणाऱ्या कोणत्याही संभाव्य कारवाईबद्दल सतर्क आहोत, असे म्हटले.भारतातकडून मोठा बदल या हल्ल्याचा घेतला जाणार असल्याचे सांगितले जातंय. काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे. भारताकडून या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी प्लॅन तयार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे की, भारत कशाप्रकारे पाकिस्तानचा बदला घेतो. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जीव गेलेल्या लोकांचे पार्थिव त्यांच्या शहरात येत असून लोकांमध्ये मोठा संताप पाकिस्तानच्या विरोधात बघायला मिळतोय.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.