मुलाला पत्नीकडे द्यायला सांगितलं, नंतर ओळख विचारली; भारत नाव ऐकून गोळी मारली, पत्नी-मुलासमोरच संपवलं.

 जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी बेंगळुरूचे भारत भूषण यांची गोळ्या झाडून हत्या केली. कुटुंबासोबत सुट्टीसाठी ते काश्मीरला गेले होते. दहशतवाद्यांनी भारत यांचे नाव विचारून त्यांना गोळी झाडली.जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी बेंगळुरू येथील भारत भूषण यांची गोळ्या घालून हत्या केली. भारत हे त्याच्या कुटुंबासह सुट्टीसाठी काश्मीरला आले होते. पहलगाममध्ये असताना त्यांना दहशतवाद्यांनी घेरलं. भारत यांनी दहशतवाद्यांना आपलं नाव सांगितलं. त्यानंतर कोणताही विचार न करता दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांच्या पत्नी आणि मुलासोबतच त्यांची हत्या केली.भारत यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भारत यांचे वडील ७४ वर्षीय चेन्नवीरप्पा यांना बुधवारी सकाळी लेकाच्या निधनाची माहिती मिळाली. चेन्नवीरप्पा यांनी सांगितलं, की ‘मी सकाळी फिरायला जाताना कन्नड वर्तमानपत्रात याबद्दल वाचलं. माझे पाय थरथरायला लागले. मला काय करावं हे कळत नव्हतं.

माझ्या कुटुंबाने हे माझ्यापासून आणि माझ्या पत्नीपासून लपवून ठेवलं होतं. मृत्यूच्या काही तास आधी, भारतने काश्मीरहून मला फोन करुन तेथील सुंदर दृष्य दाखवली होती.’पुढे ते म्हणाले, ‘मंगळवारी दुपारी हल्ल्याची माहिती मिळाली. तसंच मित्रांनीही या हल्ल्यात अनेक जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. या बातमीनंतर मी सुनेला टीव्ही चालू करण्यास सांगितलं. पण टीव्हीला सिग्नल नव्हता. मला बातम्या पाहायच्या होत्या. पण टीव्ही चालू नसल्याचं मला सांगितलं. माझ्या सुनेला आणि मुलगा प्रीतम यांना सगळं काही माहिती होतं. पण मला त्यांनी सांगितलं नव्हतं. त्यांचं हे दु:ख मी समजू शकतो.

‘संध्याकाळी मुलगा प्रीतम याने सांगितलं, की भारत जखमी झाला आणि त्याला परत आणण्यासाठी काश्मीरला जात आहे. तो गंभीर नाहीये, त्याला घरी घेऊन येऊ. मला आणि माझ्या पत्नीला अतिशय काळजी वाटत होती. आम्ही दोघांनी देवाकडे भारतच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केली होती. पण पाहा देवाने आमच्या प्रार्थनेसोबत काय केलं?दहशतवादी ज्यावेळी आले, तेव्हा भारतच्या कुशीत त्याचा मुलगा होता. दहशतवाद्यांनी मुलाला पत्नीकडे सोपावण्याचं सांगितलं. मुलाला भारतने पत्नीकडे दिल्यानंतर दहशतवाद्यांनी भारतला त्यांचं विचारलं. त्यांनी भारत भूषण सांगितल्यावर हिंदू आहे की मुस्लीम विचारलं. भारतने हिंदू असं उत्तर दिलं आणि त्याला गोळी मारली, अशी माहिती भारत यांच्या वडिलांनी दिली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.