रितेश देशमुखच्या राजा शिवाजी सिनेमाच्या शूटिंग सेटवर घडली दुर्घटना.

रितेश देशमुखच्या राजा शिवाजी सिनेमातल्या क्रूचा मृतदेह सापडला आहे. गेले दोन दिवस नदीच्या पात्रात त्याचे शोधकार्य चालू होते.मुंबई- रितेश देशमुखच्या शिवछत्रपतींवर आधारित आगामी सिनेमाचं सिनेमाचं साताराजवळील एका गावात शूटिंग सुरू होते. त्यादरम्यान त्या क्रूमधला एका सहकलाकार बेपत्ता झाल्याची बातमी चित्रपटाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, साताराजवळ नदीकिनारी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. दोन दिवसांच्या शूटिंगनंतर, सर्व कलाकार हॉटेलमध्ये परतले होते, तेव्हाच त्यांच्या टीममधील एक सदस्य बेपत्ता असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आता त्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडल्याचे समोर आले आहे

मिळालेल्या माहितीनुसार, शूटिंग संपल्यानंतर, क्रूमधील काही लोक नदीत पोहायला उतरले होते. तिथे पोहताना सौरभ शर्मा नावाचा एक डान्सर बेपत्ता झाला. ही बातमी मिळताच चित्रपटाचा अभिनेता आणि दिग्दर्शक Riteish Deshmukh, चित्रपट निर्माती जेनेलिया देशमुख, नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा इत्यादींनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रितेशने तातडीने जिल्हा प्रशासनाला याची माहिती दिली, त्यानंतर स्थानिक प्रशासकीय अधिकारीही घटनास्थळी पोहोचले.गेले दोन दिवस सौरभचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होते. यामध्ये ड्रोन इत्यादींचीही मदत घेतली गेलली. सौरभच्या कुटुंबाला अपघाताची माहिती देण्यात आली होती.

हे वृत्त लिहिईपर्यंत, बेपत्ता नर्तकीचा शोध लागला नव्हता. सौरभला चांगले पोहता येत होते पण तरीही त्याचा बुडून मृत्यू झाला.नदी पात्राच्या खोलीचा अंदाज न आल्याने सौरभ खेचला गेला. स्थानिक प्रशासनाकडून गेले २ दिवस शोधमोहिम सुरू होती. मात्र अंधारामुळे शोधकार्यात अडचणी येत होत्या. अखेर ३६ तासांनी सौरभचा मृतदेह सापडला आहे.संगम माहुली मंदिर सातारा येथे ही दुर्घटना घडली. पहिले दोन दिवस शूटिंग निर्विघ्न पार पडलेले पण तिसऱ्या दिवशी पॅकअपनंतर हे घडलं. राजा शिवाजी सिनेमाबद्दल बोलायचे झाल्यास या सिनेमात रितेश शिवरायांची भूमिका साकारणार आहे. याशिवाय या सिनेमात अभिषेक बच्चन, संजय दत्त, फरदीन खान यांच्याही भूमिका पाहायला मिळतील.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.