पहलगाम हल्ल्यानंतर भारताने अटारी सीमा केली बंद, पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसणार .

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्याने भारताने कठोर पाऊल उचललं आहे. अटारी चेक पोस्ट तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा परिणाम पाकिस्तानवर होणार असून भारत आणि अफगाणिस्तानच्या आयात-निर्यातीवरही याचा परिणाम होईल.जम्मू – काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठं पाऊल उचललं आहे. भारत सरकारने अटारी चेक पोस्ट (ICP) तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या सुरक्षेशी संबंधित कॅबिनेट समितीने हा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी बुधवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, वैध कागदपत्रांसह सीमा ओलांडणारे १ मे २०२५ पूर्वी त्याच मार्गाने परत येऊ शकतात, परंतु हा मार्ग केवळ एका निश्चित कालावधीसाठी खुला राहील.

आता भारताच्या या निर्णयानंतर भारत आणि पाकिस्तानमधील व्यापारावर काय परिणाम होऊ शकतो. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अटारी बॉर्डर हा एकमेव जमीनी मार्ग आहे, ज्याद्वारे दोन्ही देशांमधील व्यापार होतो. अमृतसरपासून फक्त २८ किमी अंतरावर असलेलं अटारी हे भारतातील पहिलं भू-बंदर आहे आणि पाकिस्तानशी व्यापार करण्यासाठी एकमेव भू-मार्ग आहे. हे बंदर १२० एकरमध्ये पसरलेलं आहे. तसंच ते थेट राष्ट्रीय महामार्ग-१ शी जोडलेलं आहे.भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे, आधीच कमकुवत झालेल्या व्यापारी संबंधांना अटारी बॉर्डर बंद करण्याने मोठा धक्का बसणार आहे. अटारी चेकपोस्ट बंद करण्याच्या निर्णयाचा परिणाम दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या व्यापारावर अवलंबून असलेल्या लहान व्यापारी आणि उद्योगांवर होईल, असं सांगितलं जात आहे.२०२३-२४ मध्ये या बंदरातून ६,८७१ मालवाहू वाहनं गेली आणि ७१,५६३ लोकांनी या मार्गाने प्रवास केला.

या कालावधीत एकूण ३,८८६.५३ कोटी रुपयांचा व्यापार झाला होता.भारत अटारी चेक पोस्टमार्गे पाकिस्तानला सोयाबीन, चिकन फीड, भाज्या, प्लास्टिकचे दाणे, प्लास्टिकचा धागा आणि लाल मिरची यासारख्या वस्तू पाठवतो. तर पाकिस्तान आणि इतर देशातून भारतात सुखे मेवे, सूखे खजूर, सीमेंट, कांच, सैधव मीठ आणि विविध प्रकारच्या जड़ी-बुटी येतात. आता हे बंद केल्याने या गोष्टींच्या व्यापारावर परिणाम होणार आहे, छोटे व्यापारी आणि कंपन्यांना या फटका बसू शकतो, जे या सीमापार व्यापारावर अवलंबून आहेत.भारताच्या अटारी चेक बंदच्या निर्णयानंतर भारत आणि अफगाणिस्तानमधील आयात-निर्यातीवरही परिणाम होऊ शकतो. याच मार्गाने अनेक गोष्टी पाकिस्तानमार्गे भारतात येतात-जातात. आता हा मार्ग बंद झाल्यामुळे, माल पोहोचवण्यात अनेक अडचणी येऊ शकतात, ज्यामुळे लॉजिस्टिक्स अर्थात मालवाहतुकीशी संबंधित समस्या वाढू शकतात.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.