जम्मू-काश्मीर येथे आठ वर्षांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आठवर्णीची खपली पुन्हा एकदा निघाली.

सन २०१७मध्ये अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात डहाणूतील दोन महिलांचा मृत्यू झाला होता, तर सहा जण गंभीर जखमी झाले होते.जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे दशहतवादी हल्ल्यानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर येथे आठ वर्षांपूर्वी सन २०१७मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आठवर्णीची खपली पुन्हा एकदा निघाली. अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात डहाणूतील दोन महिलांचा मृत्यू झाला होता, तर सहा जण गंभीर जखमी झाले होते.आठ वर्षांपूर्वी पहलगामपासून जवळ असलेल्या अनंतनाग जिल्ह्यात जुलै २०१७मध्ये चालत्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शी डहाणूच्या प्रकाश वजानी (वय ७१) यांनी त्या हल्ल्यातील आठवणी मांडल्या.

सायंकाळी साडेसात ते पावणेआठच्या सुमारास शेतात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. बसच्या डाव्या बाजूने अचानक गोळ्या झाडल्याचा आवाज आला. प्रसंगावधान राखत काही आसनाच्या खाली लपले. मात्र, खिडकी जवळ असलेले काहीजण गोळी लागून जखमी झाले.गोळ्यांमुळे खिडकीच्या काचा फुटून माझ्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यात भावाची पत्नीही जखमी झाली. तर डहाणूतील निर्मलाबेन ठाकूर आणि उषा सोनकर या दोघींचा मृत्यू झाला होता. तर या तालुक्यातील यशवंत डोंगरे आणि योगिता डोंगरे, प्रकाश वजानी, पुष्पा गोसावी, भाग्यमणि ठाकूर, गीता रावळ हे सहा जण जखमी झाले होते.

असे भ्याड हल्ले माणुसकीला काळीमा फासणारे आहेत. धर्माच्या नावाखाली अमानुषपणा थांबवायला हवा. आठ वर्षांपूर्वी आम्ही अशा हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी होतो. पहलगाम घटनेची बातमी टीव्हीवर पाहून जुन्या आठवणीने अंगावर काटा आला.केंद्र सरकारने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज, गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी या बैठकीची मागणी केली होती. त्यानुसार ही बैठक होणार आहे.दिल्लीतील पाकच्या दूतावासातील लष्कर, नौदल व हवाई सल्लागारांना एका आठवड्यात भारत सोडून जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भारताने इस्लामाबादमधील आपल्या उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांनाही मायदेशी बोलावले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.