बंद घरावर चोरट्यांचा डल्ला : सोन्याचे दागिने लांबविले !

दाम्पत्य घर बंद करुन लग्नाला गेलेले असतांना चोरट्यांनी त्यांच्या घरात डल्ला मारला. याठिकाणाहून त्यांनी ६० हजारांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. चोरी केल्यानंतर चोरट्यांनी शेजारी राहणाऱ्या सुरक्षा रक्षकाची दुचाकी चोरुन ते दुचाकीवरुन पसार झाले. ही घटना दि.२२ रोजी कोल्हे हिल्स परिसरातील माऊली नगरात घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील माऊली नगरात दिनकर खेमचंद पाटील (वय ४३) हे वास्तव्यास असून ते खासगी कंपनीत नोकरीला आहे दि. २१ एप्रिल रोजी मध्यरात्री तीन वाजता त्यांच्या मुलाला पुणे येथे जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर सोडले. त्यानंतर सकाळी पाटील दाम्पत्य बऱ्हाणपूर येथे लग्नासाठी गेले होते. लग्नाहून परततांना ते त्यांच्या सासूरवाडी येथे मुक्कामी थांबले होते. त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराचे सेफ्टी डोअरसह मुख्य दरवाजा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला.

त्यानंतर घरातील हॉल, किचनसह बेडरुममधील साहित्य अस्ताव्यस्त फेकून त्यांनी कपाटात ठेवलेले १५ हजार रुपयांचे कानातील झुमके आणि ३३ हजारांच्या सोन्याच्या अंगठ्या असा ऐवज चोरुन नेला.घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी तालुका पोलीसांसह श्वान पथक व ठसे तज्ज्ञ व फॉरेन्सीकचे पथक दाखल झाले होते. त्यांनी घटनास्थळाहून पुरावे गोळा केले असून त्यावरुन पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.