‘आम्हाला परत यायचंय, काही तरी व्यवस्था करा’, काश्मीरमध्ये अडकलेल्या पुण्यातील पर्यटकांची आर्त साद.

 ‘आम्ही पहलगामवरून कटरा येथे आलो… आम्हाला पुण्यात परतायचेय…आम्ही १४ जण आहोत. आमची सोय करता येईल का…? अशा स्वरूपाचे तब्बल पाचशेहून अधिक फोन कॉल पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षात येत होते.’आम्ही पहलगामवरून कटरा येथे आलो… आम्हाला पुण्यात परतायचेय…आम्ही १४ जण आहोत. आमची सोय करता येईल का…?या आणि अशा स्वरूपाचे सुमारे पाचशेहून अधिक फोन कॉल पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षात येत होते. बुधवारी रात्री उशिरापर्यंतही फोन सुरूच होते. पर्यटकांची विचारपूस, त्यांना आधार देत आणि त्यांच्याकडून माहिती घेण्याचे काम आपत्ती नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांकडून काल रात्रीपासूनच सुरू होते. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनासनुसार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांच्यासह कक्षातील राहुल पोखरकर, श्याम शेवते, गौरी बाबर, विश्वास जाधव, मजहर झारी यांच्यासारख्या कर्मचाऱ्यांनी रात्र जागून काढली आणि दिवसाची रात्र करीत अडकलेल्या पर्यटकांची यादी तयारी केली.

आम्ही निम्म्या रस्त्यापर्यंत गेलो अन् कोथरूडच्या साक्षी कलाटे यांनी सायंकाळी सहाच्या सुमारास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. त्या म्हणाल्या, ‘आम्ही पुण्याहून १८ एप्रिलला काश्मीरलला आलो. काल घटना घडण्यापूर्वी आम्ही पहलगाम येथे अर्धा डोंगर चढलो होतो. आम्ही निम्म्या रस्त्यापर्यंत गेलो. घोडे चालविणाऱ्याने झाड पडल्याचे सांगितले. त्यानंतर अचानक गोळीबार झाल्याचे समजले. आम्ही नंतर हॉटेलमध्ये गेलो. रात्र हॉटेलमध्येच काढली. आम्ही १४ जण पहाटे साडेचार वाजता पहलगामवरून कटरा येथे आलो आहोत. आम्हाला आता पुण्यात यायचेय. काही सोय करता येईल का?’ अशा शब्दांत कलाटे मदत मागताना तेथील ‘आँखो देखा हाल’ नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांना सांगत होत्या.’काल आम्ही येथे आलो आणि गोळीबाराची घटना घडली. आता आम्हाला पुण्यात यायचेय. काही करून आम्हाला परत आणण्याची व्यवस्था करा,’ अशी विनवणी करणारा काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या नवदाम्पत्यांचाही फोन नियंत्रण कक्षात धडकला. ‘आम्हाला येथून बाहेर कधी काढण्यात येईल,’ यासारखी चौकशी फोनवरून नियंत्रण कक्षाकडे केली जात होती. जिल्हा नियंत्रण कक्षाला बुधवारी रात्री आठ वाजेपर्यंत 610 जणांनी संपर्क केला. मात्र, त्यानंतरही संपर्क करणाऱ्यांमध्ये पूर्वी फोन करणाऱ्यांकडून सातत्याने संपर्क केला जात होता. त्यांच्याकडून मदतीबाबत चौकशी करण्यात येत होती.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.