मोबाईल जप्त करताच मुलीला आला राग, काढली चप्पल अन् केली शिक्षिकेची धुलाई, कॉलेजमधील व्हिडीओ व्हायरल.

वर्ग सुरू असताना मुलगी वापरत होती मोबाईल, तेवढ्यात शिक्षकांनी मोबाईल केला जप्त, परिणामी मुलीला आला राग अन् तिनं चप्पलेनं शिक्षिकेला केली मारहाण, पाहा व्हायरल व्हिडीओ.आरोग्य तज्ज्ञ म्हणताहेत, मोबाईल फोन वापरणं हे दिवसेंदिवस व्यसन होत चाललं आहे. लोकं अगदी सकाळी उठल्यापासून पार रात्री झोपेपर्यंत मोबाईलच्या सानिध्यात राहतात. बरं, जर त्यांच्याकडून फोन हिसकावून घेतला तर ते अगदी एखाद्या रानटी जनावराप्रमाणे अंगावर धावून जातात. अन् याचिच प्रचिती देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे.शिक्षिकेनं एका विद्यार्थीकडून तिच्या मोबाईल फोन काढून घेतला. कारण ती वर्ग सुरू असताना मोबाईल वापरत होती. आता अशा स्थितीत आपण काय विचार करू? शिक्षकांची माफी मागून मोबाईल परत मिळवण्याचा प्रयत्न करूया. पण ही विद्यार्थीनी फारच धीट निघाली. तिनं थेट चप्पल काढली आणि थेट शिक्षिकेला मारहाण केली.

हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. आता तुम्हीच सांगा अशा व्यसनाधिन मोबाईल युझर्सला रोखायचं तरी कसं?मीडिया रिपोर्टनुसार ही घटना आंध्र प्रदेशमधील रघु इंजीनियरिंग कॉलेजमध्ये घडली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. एक तरुणी शिक्षिकेचा पाठलाग करत त्यांच्याकडून आपला मोबाईल फोन परत मिळवण्याचा प्रयत्न करतेय. अर्थात शिक्षक काही पहिल्याच विनंतीमध्ये मोबाईल परत देणार नाहीत. अशा वेळी थोडं संयमानं, थोडी माफी मागून, थोडासा मस्का लावून शिक्षकांनी बोलावं लागतं. पण तरुणी वेगळ्याच टशनमध्ये होती. तिनं पायातली चप्पल काढली अन् ती थेट शिक्षिकेवर तुटून पडली.चपलेनं शिक्षिकेला चांगलंच बदडून काढलं. दरम्यान शिक्षिकेनं देखील प्रतिहल्ला केला खरा. पण तो पर्यंत शिक्षिकेला चांगल्या सात-आठ चपराख बसल्या होत्या हा व्हिडीओ @gharkekalesh या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. या प्रकरणी शिक्षिका आणि विद्यार्थीनीची कॉलेज मॅनेजमेंटकडून चौकशी केली जात आहे. तोपर्यंत दोघांनाही कॉलेजमधून सस्पेंड करण्यात आलं आहे. पण हा व्हिडीओ पाहून नेटकरी मात्र चांगलेच भडकले आहेत. व अशा बेशिस्त विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करताहेत. असो, या प्रकरणात खरी चूक कोणाची आहे? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.